मुंबई : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हा नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत असतात. आता विजय वडेट्टीवार हे पुन्हा एकदा चर्चेत आले असून यावेळी कारण देखील जरा वेगळे आहे.
विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. वडेट्टीवार यांच्यावर गुन्हे लपवल्याचा आरोप आहे. भाजपचे माजी आमदार मितेश भांगडिया यांनी तक्रार केली होती. त्यात त्यांनी विजय वडेट्टीवार यांनी आपल्यावर असणाऱ्या क्रिमिनल केसेस लपवल्या असल्याचा आरोप केला होता.
भांगडिया यांनी अनेक वेळा मुख्यमंत्र्यांपासून ते पासपोर्ट ऑफिसपर्यंत तक्रार केली होती. नंतर कारवाई झाली नाही तेव्हा ते हायकोर्टात गेले.मिळालेल्या माहितीनुसार विजय वडेट्टीवार यांनी पासपोर्टसाठी मनोरा हा पर्मनंट अॅड्रेस दिला होता. तिथल्या पोलीस स्टेशनमधून एनओसी घेतली होती. त्यात त्यांच्यावर कुठेही केसेस सुरू नाहीत. त्यामुळं भांगडिया कोर्टात गेले.
त्यावेळी कोर्टाने पासपोर्ट ऑफिसला नोटीस काढल्या. त्यानंतर पासपोर्ट कार्यालयाने विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त केला असल्याची माहिती आहे.’एबीपी माझा’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- राणा दाम्पत्य म्हणजे नाटक कंपनी; शिवसेनेच्या माजी खासदाराची घणाघाती टीका
- आपल्या गायकीमुळे चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं रिलीज
- ‘मालकीण इटालियन असलेल्या थोरातांनी बाबर खानदानावर असलेली काँग्रेसची वादातीत निष्ठा सिद्ध केली’
- ट्रम्प यांचे मित्र मोदी हे भारतीय लोकांचे विभाजन आणि राज्यघटना बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत : सिंह
- ‘शिवसेना वाढवण्यासाठी मी मेहनत घेतली होती,मात्र…’; पक्ष सोडताना ‘हा’ नेता झाला भावूक


