Share

पंतप्रधान घरकुल योजना म्हणजे ‘सपनो का घर सपने मे ही मिलेगा’; इम्तियाज जलील यांनी साधला मोदींवर निशाणा!

Published On: 

औरंगाबाद : मार्च २०२२ ला पंतप्रधान आवास योजनेची मुदत संपणार असुन केंद्र, राज्य व जिल्हा प्रशासनाच्या उदासिनता व कार्यपध्दतीवर गंभीर स्वरुपाचे आरोप खासदार इम्तियाज जलील(Imtiayaj Jaleel) यांनी सुभेदारी विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले असून पंतप्रधान घरकुल योजना म्हणजे ‘सपनो का घर सपने मे ही मिलेगा’ अशी टिका थेट पंतप्रधान नरेंद मोदीवर(PM Narendra Modi) केली.

महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक गोरगरीब लोकांना सर्व सोयीसुविधायुक्त स्वत:ची पक्की घरे मिळणार असल्याचे जाहीर करुन कोटयावधी रुपयांचे होर्डिंग व जाहीराती लावून शासकीय पैशांचा गैरवापर करुन सर्वसामान्य गोरगरीब नागरीकांची चेष्टा केली आहे. याचा लोकसभेत थेट नरेंद्र मोदींनाच जाब विचारणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले. देशातील प्रत्येक गोरगरीब कुटुंबाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मार्च २०२२ पर्यंत सर्वांना जलजोडणी, शौचालयाची व्यवस्था, २४ तास वीज व पोहोचरस्ता या सुविधांसह पक्के घर पंतप्रधान आवास योजनेतंर्गत देणार असल्याचे घोषित केले होते.

स्वत:ची घरे मिळणार या आशेने वर्ष २०१६ मध्ये औरंगाबाद शहरातील ८०५१८ गोरगरीब नागरिकांनी कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने महानगरपालिकेकडे अर्ज सादर केले. गेल्या सात वर्षामध्ये जिल्हा प्रशासनाने फक्त ३५५ लाभार्थी म्हणजे एक टक्क्यापेक्षा कमी लाभार्थीयांना घर दुरुस्तीसाठी लाभ दिला. हि बाब शहरासाठी लाजीरवाणी असुन घरकुल योजने संदर्भात केंद्र, राज्य व जिल्हा प्रशासनावर अनेक गंभीर स्वरुपाचे आरोप जलील यांनी केले. पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देतांना सांगितले की, केंद्र शासनाने जाहीर केलेल्या सर्वांसाठी घरे २०२२ या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये चार घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

या घटकांचा समावेश

घटक क्र. १ मध्ये जमिनीचा साधनसंपत्ती म्हणून वापर करुन त्यावरील झोपडपट्यांचा आहे तेथेच पुनर्विकास करणे. घटक क्र. २ मध्ये कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे. घटक क्र. ३ मध्ये खाजगी भागीदारीव्दारे परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे म्हणजे फ्लॅट सिस्टिम. घटक क्र. ४ मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरुपातील घरकुल बांधण्यास अनुदान अशा प्रकारे घटक तयार करण्यात आल्याची माहिती दिली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!