औरंगाबाद : कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडत आहेत. केंद्र सरकारही शेतकऱ्यांसाठी वैविध्यपूर्ण योजना आखत आहेत. शेतकऱ्यांना फायदा व्हावा, शेती तोट्यात राहू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शेतकऱ्यांवर सर्वाधिक लक्ष आहे. असे प्रतिपादन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी जाफराबाद याठिकाणी केले.
रावसाहेब दानवे यांना रेल्वे राज्यमंत्री पद मिळाल्याने जाफराबाद तालुक्यातील भारतीय जनता पक्षातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना पुढे म्हणाले, शेतकऱ्यांनी आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरायला हवी. तसेच नावीन्यपूर्ण संशोधनाचा उपयोग करून जास्तीत जास्त पिके कसे उगवता येईल याचा विचार करायला हवा. आपल्या मालाला कोणत्या ठिकाणी भाव मिळतो तिथे माल विकण्याचे स्वातंत्र्य नवीन कायद्यानुसार देण्यात आले आहे.
दानवे रेल्वे राज्यमंत्री झाल्यामुळे तालुक्याची मान उंचावली असल्याचे दिवटे यांनी यावेळी सांगितले. तसेच दहा हजारांपेक्षा अधिक कार्यकर्ते दिल्लीत जाऊन त्यांना भेटून आले. आणि हीच त्यांची खरी कमाई आहे. आता गावपातळीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असे त्यांनी यावेळी सांगितले. दलालांना टाळून ऑनलाईन माध्यमाचा वापर करत आपल्या शेतीमालाला योग्य आणि थेट बाजार मिळवून देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या सीएसआयआर या संस्थेशी संलग्न किसान सभा डिजिटल कार्डचे विमोचनही रावसाहेब दानवे यांच्या हस्ते सिल्लोड येथे करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘..यामुळेच शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक केली’, खा.भावना गवळींचा खुलासा
- नितीन लांडगे यांच्याविरुद्ध झालेल्या आरोपांची शहानिशा करण्याची जबाबदारी माधुरी मिसाळ यांच्यावर
- पारनेर तहसीलदारांच्या ऑडिओ क्लिपवर निलेश लंकेंची प्रतिक्रिया
- शेतकऱ्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विशेष लक्ष, रावसाहेब दानवेंचे प्रतिपादन!
- शिवसेनेच्या हल्ल्यांना आणि धमक्यांना मी घाबरत नाही – किरीटी सोमय्या


