Share

पारनेर तहसीलदारांच्या ऑडिओ क्लिपवर निलेश लंकेंची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या एका ऑडिओ क्लिपमुळे राज्यात खळबळ उडाली असून पारनेरमधील लोकप्रतिनिधीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी या क्लिपमध्ये दिला आहे. यात त्यांनी कोणत्याही लोकप्रतिनिधीचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख हा आमदार निलेश लंके यांच्यावर असल्याचे दिसून येते. यावर आता निलेश लंकेंनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.

मला वैयक्तिक स्वरुपात काम करताना तहसीलदार ज्योती देवरे यांचा भ्रष्टाचार दिसून आला. ज्या-ज्या वेळी मी त्यांना सूचित करण्याचा प्रयत्न केला त्या-त्या वेळी त्यांनी मला रात्री अपरात्री मेसेज करुन सांगितले की, जर तुम्ही या गोष्टी उघड केल्या तर मी आत्महत्या करेल, असा मोठा गौप्यस्फोट निलेश लंके यांनी केला आहे.

ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप गेल्या 2 दिवसांपासून व्हायरल होत आहे. त्यांनी केलेला हा केवीलवाणा प्रयोग आहे. त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराचे आरोपही सिद्ध झाले आहेत. तसा अहवालही नाशिक विभागीय आयुक्तांनी मुंबईला पाठवला आहे. या आधीही असे बरेच प्रकार त्यांनी केले आहेत, असा आरोपही यावेळी निलेश लंके यांनी केला आहे.

दरम्यान, ज्या विभागात त्या काम करतात त्या विभागात काम करणाऱ्यांनाही त्या दोषी धरतात. त्या साधूसंतांसारखं काम करतात आणि बाकीचे सर्वजण चुकीचे काम करतात असं त्या नेहमी दाखवतात, असा गंभीर आरोपही यावेळी निलेश लंके यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!