वाशिम : शिवसैनिकांनी माझ्या गाडीवर दगडफेक केल्याचा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांनी आपल्या गाडीचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये गाडीवर शाई फेकण्यात आल्याचं दिसत आहे. वाशिममधील बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याजवळ ही घटना घडल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे.
काल गुरुवारी सोमय्या यांनी ट्विटरवरुन आपण २० ऑगस्ट रोजी शिवसेना खासदार भावना गवळी आणि समूहाचा १०० कोटी रुपयांचा घोटाळा उघड करण्यासाठी तसेच या प्रकरणाचा पाठपुरवठा करण्यासाठी वाशिमला भेट देणार असल्याचं जाहीर केले होते. याच भेटीदरम्यान हल्ला करण्यात आल्याचं सोमय्या यांचं म्हणणे आहे.
दरम्यान या हल्ला प्रकरणी शिवसेना खासदार भावना गवळी यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. ‘त्यांना सांगितलं होतं जाऊ नका, तरीही ते गेले. आक्रमक शिवसैनिकांकडून त्यामुळेच दगडफेक झाली असावी’ असे त्या म्हणाल्या. ‘पार्टीकल बोर्ड कारखाना हा शेतकऱ्यांचा आहे. शिवाय पोलिसांनी कारखान्यावर जाऊ नका, असे सांगूनही ते गेले, त्यामुळं शेतकरी आणि शिवसैनिक आक्रमक झाले. त्याचमुळे दगडफेक झाली असावी, असं भावना गवळी म्हणाल्या.
‘शिवसेनेच्या धमक्यांना मी घाबरत नाही. अशा रोजच मला धमक्या येतात. मी आज वाशिम येथे आलो असता माझ्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. अशा हल्ल्यांना मी घाबरत नाही’, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, १३ जणांचा मृत्यू
- कोकण पुरामुळे बुडत असताना स्वतःला कोकणचा नेता म्हणवून घेणारे कुठे होते? – भाई जगताप
- ‘गोमूत्र शिंपडणारे समोर आले असते तेच गोमूत्र कोल्ड्रिंग सारखं घशात घालून पुढे निघालो असतो’
- संभाजीराजेंनी केलं प्रकाश आंबेडकरांच कौतुक; तर अशोक चव्हाणांवर हल्लाबोल
- अशोक चव्हाणजी, आम्हीही ९६ टक्केवाले मराठे आहोत!’, संभाजीराजेंचा हल्लाबोल

