🕒 1 min read
पिंपरी चिंचवड – भाजपची एकहाती सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.9 लाख रुपयांच्या लाच प्रकरणात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचे स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेकडून कामाचे टेंडर मंजूर झाले होते. त्याची वर्क ऑर्डर काढण्यासाठी एका ठेकेदाराकडे स्थायी समिती अध्यक्षांच्या नावाने नऊ लाखांची लाच मागितली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा लावून कारवाई करत स्थायी समिती अध्यक्ष, त्यांचे स्वीय सहाय्यक आणि दोन लिपिकांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 18) पिंपरी चिंचवड महापालिकेत करण्यात आली.स्थायी समिती अध्यक्ष नितीन ज्ञानेश्वर लांडगे, स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे, क्लार्क अरविंद कांबळे, राजेंद्र शिंदे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड महापालिकेने एका ठेकेदाराचे कामाचे टेंडर मंजूर केले होते. त्या टेंडरची वर्क ऑर्डर काढण्यासाठी स्थायी समिती अध्यक्षांच्या नावाने नऊ लाखांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत एसीबीकडे तक्रार केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा लावून कारवाई केली. मागणी केलेल्या नऊ लाखांमधील दोन लाख रुपये लाच घेताना स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे यांना एसीबीने रंगेहाथ पकडले.एसीबीच्या पथकाने बुधवारी दुपारी पालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर येऊन अचानक कारवाई केली. स्थायी समिती अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक यांची केबिन त्यानंतर अध्यक्षांची केबिन पोलिसांनी बंद केली आणि चौकशी सुरू केली. बराच वेळ चौकशी केल्यानंतर एसीबीच्या पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान,पिंपरी-चिंचवड स्थायी समिती अध्यक्षांविरुद्ध झालेल्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी आमदार माधुरी मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत घोषणा केली आहे. पिंपरी-चिंचवड स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांना सुनियोजित षडयंत्र आखून जाळ्यात अडकविल्याचे एकूण परिस्थितीवरून लक्षात येत आहे. मात्र, या प्रकरणाची तपशीलवार माहिती घेऊन या कटकारस्थानाचा मूळ शोधण्यासाठी भाजपाच्या पिंपरी-चिंचवडच्या प्रभारी आमदार माधुरी मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. सत्तेचा दुरुपयोग करून आमच्या लोकप्रतिनिधींवर आरोप केले जात आहेत. त्यांना अडकविण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र आमचा न्याय संस्थेवर विश्वास आहे व लवकरच सत्य बाहेर येईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘थग ऑफ हिंदुस्थान’नंतर कटरीना आणि बीग बी पुन्हा एकत्र
- लसींचे दोन डोस घेतले तरी देखील खासदार अमोल कोल्हेंना कोरोनाची लागण
- ‘मी त्याच दिवशी खासदारकी सोडणार होतो पण…’; छत्रपती संभाजीराजेंचा गौप्यस्फोट
- जनआर्शिवाद यात्रा : डॉ. भागवत कराड येण्याआधीच स्थानिक नेत्यांनी भागवली सत्काराची हौस
- ‘संभाजी भोसलेंना अटक करा’; गुणरत्न सदावर्ते यांची स्फोटक मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
