Share

शिवसेनेच्या हल्ल्यांना आणि धमक्यांना मी घाबरत नाही – किरीटी सोमय्या

Published On: 

मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याचा निंदनीय प्रकार आज समोर आला आहे. राज्यात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेच्या शिवसैनिकांनी ही दगडफेक केल्याचा आरोप करण्यात येत आहे. सोमय्या यांनी शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर १०० कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते.

आज किरीट सोमय्या वाशिम दौऱ्यावर असताना बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याची पाहणी करण्याकरिता या ठिकाणी ते येणार होते. मात्र भावना गवळी यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्या यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवत त्यांच्या ताफ्यावर दगडफेक तसेच शाईफेक केल्याचा आरोप होतोय.

शिवसेनेच्या धमक्यांना मी घाबरत नाही. अशा रोजच मला धमक्या येतात. मी आज वाशिम येथे आलो असता माझ्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. अशा हल्ल्यांना मी घाबरत नाही, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना दिली.

दरम्यान, या हल्ल्यानंतर भाजपकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना खासदार भावना गवळी यांनी देखील या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘त्यांना सांगितलं होतं जाऊ नका, तरीही ते गेले, आक्रमक शिवसैनिकांनी म्हणूनच दगडफेक केली असावी, असं भावना गवळी म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!