नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि टेलीप्रॉम्प्टर प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा एक अशी घटना घडली आहे. ज्यामुळे मोदी सध्या ट्रेंडीगवर आहेत. त्याचे झाले असे की, ब्रह्मा कुमारींनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आज पंतप्रधान मोदींनी नागरिकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले. नागरिकांना संबोधित करताना त्यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ऐवजी ‘बेटी बचाव, बेटी पटाव,’ म्हटल्याने सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. आणि हाच व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहे.
पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय स्तरावर लोकांना संबोधित करताना एका घोषणेचा चुकीच्या पद्धतीने उच्चार केल्याने त्यातून चुकीचा संदेश जातो, अशी टीका आता सर्वच स्तरातून केली जात आहे. झालं असं की मोदी ‘बेटी बचाओ, बेटी पटाओ’ या योजनेच्या यशाबद्दल सांगत होते. यावेळी बोलताना ते ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ऐवजी ‘बेटी बचाव, बेटी पटाव,’ असं म्हणाले. मात्र त्यांच्या या शब्दाला नेटकऱ्यांनी लगेच पकडले आणि आता यावरूनच पंतप्रधान मोदींची (prime minister narendra modi) खिल्ली उडवली जात आहे.
Teleprompter – शर्म करो… pic.twitter.com/AAIbeg2yk5
— Srinivas BV (@srinivasiyc) January 20, 2022
दरम्यान काँग्रेस नेते श्रीनिवास बीव्ही यांनी देखील मोदींचा हा व्हिडीओ ट्वीट करत त्यांच्यावर ‘टेलीप्रॉम्टरवर वाचूनही हे काय बोलून गेले मोदीजी, थोडी तरी लाज ठेवा,’ असे म्हटले आहे. तर समाज माध्यमावरही यावर अनेक प्रतिक्रया उमटत आहेत. यावेळी मोदींनी कार्यक्रमात बोलताना इतिहासातील काही उदाहरणे दिली. “राणी चेन्नम्मा, मातंगिनी हाजरा, राणी लक्ष्मीबाई, कित्तूरच्या वीरांगना झलकारीबाईपासून ते अहल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक क्षेत्रात भारताची अस्मिता जपली. अनेक कठीण प्रसंगांनी भरलेल्या मध्ययुगीन काळातही या देशात पन्नाध्याय, मीराबाईसारख्या थोर स्त्रिया होत्या. आणि अमृत महोत्सवात देशाच्या ज्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाची आपण आठवण करतोय, त्यातही अनेक महिलांनी बलिदान दिले आहे.” असेही ते म्हणाले आहेत. मात्र त्यांच्या एका चुकीमुळे आता मोदींवर सर्वच स्तरातून ट्रोल केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
- गोवा विधानसभा निवडणूक: भाजपने केली ३४ उमेदवारांची यादी जाहीर; उत्पल पर्रिकरांना नाकारली पणजी उमेदवारी
- राज्यात महाविकासआघाडीने केला भाजपचा सुपडा साफ; रोहित पवारांची रोखठोक पोस्ट
- घटस्फोट नाही तर कौटुंबिक कलहामुळे धनुष -ऐश्वर्या वेगळे, अभिनेत्याच्या वडिलांनी सांगितले सत्य
- “चंद्रकांत पाटील म्हणजे ‘टॉलस्टॉय’ नाही की, विद्यापीठातून त्यावर चर्चा व्हावी”, संजय राऊतांचे टीकास्त्र
- “नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा पराभव राऊतांच्या जिव्हारी, म्हणूनच निरर्थक बडबड करून ते नटसम्राटची उपमा सार्थ ठरवताहेत”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

