Share

गोवा विधानसभा निवडणूक: भाजपने केली ३४ उमेदवारांची यादी जाहीर; उत्पल पर्रिकरांना नाकारली पणजी उमेदवारी

Published On: 

मुंबई: गोवा विधानसभा (Goa Assembly elections) निवडणुकींसाठी भाजपने ३४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात पणजीमधून उत्पल पर्रिकरांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. मात्र उत्पल पर्रिकरांना ( Utpal Parrikar ) भाजपने अन्य दोन जागांचा पर्याय दिला आहे. त्यामुळे ते काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

उत्पल पर्रिकर यांनी पणजीतून उमेदवारी मागितली होती. पण ही उमेदवारी विद्यमान आमदार बाबुश मोन्सेरात यांना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पणजी ऐवजी अन्य दोन जागांपैकी एका जागेचा पर्याय उत्पल पर्रिकर स्वीकारणार का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे. “गेल्या १० वर्षांमध्ये गोव्यात भाजपनं स्थिर सरकार आणि विकासाचा मुलमंत्र प्रत्यक्षात उतरवला आहे. गोव्याच्या राजकारणात जी अस्थिरता होती, ती भाजपनं संपवली होती. तसेच, भाजपनं गोव्याला विकासाच्या नव्या मार्गावर आणलं.पुन्हा एकदा लूट करण्यासाठीच काँग्रेसला गोव्यात पुन्हा सत्ता प्रस्तापित करायची आहे. काँग्रेसमधून अनेक मोठ्या नेत्यांनी अलविदा केलं आहे. आता तिथे टीएमसीही आली आहे. मनोहर पर्रीकर यांच्यापासून ते विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यापर्यंत भाजपनं गोव्यात आतापर्यंत जनतेमध्ये चांगली प्रतिमा निर्माण केली आहे.” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

तर दुसरीकडे “माझी भूमिका ठाम आहे. मी पणजीतूनच लढणार. दुसऱ्या जागेवरुन लढण्याचा कुठलाही विचार नाही. यापुढे माझी भूमिका काय असेल ते मी लवकरच जाहीर करेन. पण पणजी हाच माझा एकमेव पर्याय आहे हे नक्की.” अशी भूमिका आता उत्पल पर्रीकर यांनी घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!