मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या (Aishwarya) आणि धनुष (Dhanush) अलीकडेच त्यांच्या विभक्त झाल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. लग्नाच्या तब्बल १८ वर्षानंतर दोघांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. धनुष आणि ऐश्वर्याच्या या निर्णयाने चाहत्यांनाही धक्का बसला. आता या प्रकरणावर धनुषचे वडील कस्तुरी राजा (father Kasturi Raja) यांनी मौन तोडले असून या प्रकरणात वेगळी माहिती समोर आली आहे.
दरम्यान अभिनेता धनुषचे वडील कस्तुरी राजा यांच म्हणाले, त्यांच्यात घटस्फोटासारखे काहीही झाले नाही आणि ते केवळ कौटुंबिक कलह (‘family dispute’) आहे. त्यांनी हे एका मुलाखतीत धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांतच्या नात्याबद्दल सांगितले. याला कौटुंबिक कलह असल्याचे सांगून ते म्हणाले, “कौटुंबिक वाद हा अनेकदा विवाहित जोडप्यांमध्ये होतो. तरीही हा घटस्फोट नाही. धनुषच्या वडिलांनी सांगितले की, दोघेही सध्या चेन्नईत नसून हैदराबादमध्ये आहेत. आता त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चा होत आहे.
धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत २००४ साली लग्नाच्या बंधनात बांधले होते. अभिनेत्याने सोशल मीडियावर आपल्या आणि पत्नीच्या विभक्त झाल्याची माहिती एका पोस्टद्वारे दिली होती. त्यांनी लिहिले, “आम्ही १८ वर्षे मित्र, जोडपे, पालक आणि शुभचिंतक म्हणून एकत्र आहोत. हा वाढीचा, समजूतदारपणाचा आणि समायोजनाचा प्रवास आहे.”
धनुष आणि ऐश्वर्याच्या विभक्त होण्याच्या बातम्यांदरम्यान, सुपरस्टार रजनीकांतचा एक जुना व्हिडिओ देखील चर्चेत येत असून ते म्हणाला, “धनुष खूप छान माणूस आहे. तो आपल्या पालकांचा आदर करतो आणि त्यांना देव मानतो. बायकोची काळजी घेतो. एक चांगला पिता, एक चांगला जावई आणि एक चांगला माणूस देखील आहे.
महत्त्वाच्या बातम्या
“मला कोणी खूर्ची देतं का खूर्ची” अशी अवस्था फडणवीसांची झालीये; संजय राऊतांचे टीकास्त्र
लता मंगेशकर आजून ICU मध्ये, डॉक्टर म्हणाले त्यांच्यासाठी प्रार्थना करा
धक्कादायक! साताऱ्यात माजी सरपंचाने केली गरोदर वनरक्षक महिलेला मारहाण
“आमचा सातारचा वाघ घरी बसनार्यातला नाय…”, किरण मानेंची ‘या’ चित्रपटात लागली वर्णी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

