🕒 1 min read
मुंबई: संजय राऊत हे नटसम्राट असून दिवसा एक आणि संध्याकाळी एक बोलतात अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस केली होती. यावरच आज प्रतिक्रिया देत आम्हाला नटसम्राट म्हटल्याचा आम्हाला आनंद, पण आम्ही सोंगाडे नक्कीच नाही असा सणसणीत टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला. आता यावरूनच भाजप नेत्या चित्रा वाघ (BJP leader Chitra Wagh) यांनीही प्रतिक्रिया देत संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांना टोला लगावला आहे.
“नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा झालेला पराभव सर्वज्ञानी संजय राऊत यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे निरर्थक बडबड करत ते जनतेचं मनोरंजन करून देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली नटसम्राटची उपमा सार्थ ठरवत आहेत.” असे ट्वीट चित्रा वाघ यांनी केले आहे.
नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेची झालेला पराभव सर्वज्ञानी @rautsanjay61 जी यांच्या जिव्हारी लागलाय त्यामुळे नेहमीप्रमाणे निरर्थक बडबड करत ते जनतेचं मनोरंजन करून @Dev_Fadnavis जी यांनी दिलेली नटसम्राटची उपमा सार्थ ठरवताहेत…#नटसम्राट_राऊत pic.twitter.com/yVMYpiVD8Q
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 20, 2022
काय म्हणाले संजय राऊत?
नटसम्राट हे महाराष्ट्राचे फार मोठे वैभव आहे आणि गोव्याला रंगभूमीचा फार मोठा वारसा असल्याचं त्यांना माहिती नाही. महाराष्ट्रातील सगळे नटसम्राट गोव्यातूनच गेले आहेत. संगीत, कला, नाट्य ही गोव्याची भूमी आहे. त्यामुळे नटसम्राटची खिल्ली उडवून ते गोव्यातील जनतेचा, रसिकजनांचा आणि नाट्यकर्मींचा अपमान करत आहेत. त्यामुळे नाटकात कोणी घर देता का घर असं एक वाक्य आहे. तशीच फडणवीसांची मला कोणी खूर्ची देतं का खूर्ची अशी अवस्था आहे. अशी प्रतिक्रिया देत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना सणसणीत टोला लगावला आहे. तसेच गोव्यातील आजची परिस्थिती त्रिशंकू विधानसभेकडे चालली आहे. राष्ट्रवादीसोबत आम्ही आमच्या काही जागा जिंकून आणू. आम्ही जर काही जागा जिंकू शकलो तर सरकारमध्ये आमचं स्थान असेल. असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “मला कोणी खूर्ची देतं का खूर्ची” अशी अवस्था फडणवीसांची झालीये; संजय राऊतांचे टीकास्त्र
- लता मंगेशकर आजून ICU मध्ये, डॉक्टर म्हणाले त्यांच्यासाठी प्रार्थना करा
- “…असे कृत्य खपवून घेतले जाणार नाही”, ‘त्या’ घटनेची आदित्य ठाकरेंनी घेतली दाखल
- धक्कादायक! साताऱ्यात माजी सरपंचाने केली गरोदर वनरक्षक महिलेला मारहाण
- “आमचा सातारचा वाघ घरी बसनार्यातला नाय…”, किरण मानेंची ‘या’ चित्रपटात लागली वर्णी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
