Share

राज्यात महाविकासआघाडीने केला भाजपचा सुपडा साफ; रोहित पवारांची रोखठोक पोस्ट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यातील १०५ नगरपंचायतींपैकी ९३ नगरपंचायतींच्या ३३६ जागांसाठी आणि १९५ ग्रामपंचायतींमधील २०९ जागांसाठी मंगळवारी मतदान झाले होते. बुधवारी निकाल लागला. कर्जत नगरपंचायत निवडणुकीत आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री राम शिंदे(Ram Shinde) यांच्या नेतृत्वाखालील भाजपला चांगलाच धक्का दिला आहे. आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपंचायतीत सत्तांतर घडवले. आता सर्वच प्रमुख पक्षांकडून राज्यात आपणच नंबर १ असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचा महाविकासआघाडीने कशाप्रकारे सुपडा साफ केला? याबाबत विश्लेषणात्मक पोस्ट शेअर केली आहे.

राज्यात ३२ जिल्ह्यांमध्ये १०६ ठिकाणी नगरपंचायत निवडणुका झाल्या. महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप तर चारही पक्ष स्वतंत्र लढले, अशा पद्धतीने या निवडणुकांकडे बघता येईल. याबाबत आमदार रोहित पवार म्हणाले, प्रचारादरम्यान आपण बघितले तर भाजपने महाविकास आघाडी सरकार विरोधात अनेक मुद्दे मांडले. राज्य सरकारवर विविध प्रकारचे आरोप केले. त्यामुळे या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असाच हा सामना होता. काल आलेले निकाल बघता ९७ पैकी ६५ ठिकाणी ‘मविआ’ने तर २२ ठिकाणी भाजपने सत्ता मिळवली.

२०१७ च्या तुलनेत बघितले तर ३६ नगरपंचायतींमध्ये सत्ता असलेल्या भाजपला १४ ठिकाणी सत्ता गमवावी लागली असून २२ वर समाधान मानावे लागले. २०१७ मध्ये ‘मविआ’कडे ३७ नगरपंचायती होत्या आता ही संख्या २८ ने वाढून ६५ पर्यंत पोहचली. ‘मविआ’चे ९८४ सदस्य निवडून आले आहेत तर भाजपचे ४१६ सदस्य आहेत. सदस्य संख्येच्या बाबतीत भाजप ‘मविआ’च्या निम्मे सदस्यही निवडून आणू शकली नाही. एकूणच सर्व आकडेवारी बघितली तर मविआ विरुद्ध भाजप सामन्यात भाजपचे सुपडे साफ झालेले दिसत असून महाराष्ट्रातील जनतेने मविआ सरकारच्या कामांना पोचपावती देऊन विश्वास कायम केलेला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!