मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांच्यावर निशाणा साधत टीका केली आहे. नगरपंचायत निवडणूक ते गोवा विधानसभा निवडणूक यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी आघाडीत राहून शिवसेना रसातळाला गेली आहे अशी टीका केली होती. यावरच संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना “चंद्रकांत पाटील म्हणजे टॉलस्टॉय नाही. त्यांच्या प्रत्येक शब्दांचा अर्थ काढून आम्ही त्यावर बोलावं असं काही नाही. त्यांना काय बोलायचं ते बोलत राहू द्या. तुम्ही लोकांना ऐकवत राहा. लोकांचं मनोरंजन होईल. ते टॉलस्टॉय नाहीत की विद्यापीठातून त्यावर चर्चा व्हावी. राजकारणात अशी विधान होत असतात सोडून दिली पाहिजे.” असे म्हटले आहे.
तसेच नगरपंचायतीच्या निकालानंतर भाजप नेत्यांनी केलेल्या दाव्याची राऊत यांनी खिल्ली उडवली आहे. भाजप क्रमांक एकचा विरोधी पक्ष आहे. इतरही विरोधी पक्ष आहेत. लहान लहान पक्ष आहेत. त्यात भाजप क्रमांक एकचा विरोधी पक्ष म्हणून त्यांनी त्यांचं स्थान नगरपंचायतीत कायम ठेवल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देतो की अशीच लढाई लढा. सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची तुम्हाला बेरीज करावी लागेल. ती तुमच्यापेक्षा अधिकच आहे. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच शिवसेना हा शहरी भागातील पक्ष आहे. नगरपंचायतीत राष्ट्रवादीने जास्त जागा लढवल्या. पुणे, ठाण्यात निवडणुका झाल्या नाहीत. जिथे झाल्या तिथे आम्ही लढलो, त्यामुळे निकालाचं वेगळं चित्रं दिसत असल्याचं ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- “मला कोणी खूर्ची देतं का खूर्ची” अशी अवस्था फडणवीसांची झालीये; संजय राऊतांचे टीकास्त्र
- लता मंगेशकर आजून ICU मध्ये, डॉक्टर म्हणाले त्यांच्यासाठी प्रार्थना करा
- “…असे कृत्य खपवून घेतले जाणार नाही”, ‘त्या’ घटनेची आदित्य ठाकरेंनी घेतली दाखल
- धक्कादायक! साताऱ्यात माजी सरपंचाने केली गरोदर वनरक्षक महिलेला मारहाण
- “आमचा सातारचा वाघ घरी बसनार्यातला नाय…”, किरण मानेंची ‘या’ चित्रपटात लागली वर्णी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

