मुंबई – कोरोनाच्या कठीण काळात जगात सर्वोत्कृष्ट कार्य करणारे नेते म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्व नेत्यांमध्ये सर्वोत्तम लोकप्रिय क्रमांक एकचे नेते ठरले आहेत.
अमेरिकेच्या मॉर्निंग कन्सल्ट या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथम क्रमांकाचे नेते ठरले आहेत. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मनःपूर्वक अभिनंदन करीत असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ट्विटर द्वारे केले आहे.
सर्व भारतीय जनतेचा अतूट विश्वास जिंकणारे पंतप्रधान नरेंद्र मोदिंनी जगभरातील लोकशाही प्रेमींचा विश्वास जिंकला असून ते विश्वसनीय विश्वलिडर बनले आहेत. त्यांच्या दृष्ट्या महान नेतृत्वाचा आम्हाला अभिमान असल्याचे प्रतिपादन ना. रामदास आठवले यांनी पंतप्रधानांना शुभेच्छा देताना म्हंटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- त्या ‘वर्षा संजय राऊत’ आहेत, त्या समर्थ आहेत; ईडी चौकशीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
- मला बिझनेस नाही तर फक्त विज्ञान समजतं; कोवॅक्सिन उत्पादक कंपनीच्या प्रमुखांचं वक्तव्य
- आदर्श गाव हिवरे बाजारसह राळेगणसिद्धीत बिनविरोध नाही; अण्णांसह पोपटरावांना धक्का
- ‘काँग्रेस-राष्ट्रवादीला औरंगजेबाबद्दल एवढं प्रेम का ?’
- शेतकरी नेते कृषी कायदे रद्द करण्यावर ठाम, तर पुढील बैठकीत तोडगा निघेल; केंद्रीय मंत्र्यांना विश्वास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

