Share

शेतकरी नेते कृषी कायदे रद्द करण्यावर ठाम, तर पुढील बैठकीत तोडगा निघेल; केंद्रीय मंत्र्यांना विश्वास

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : केंद्राकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांचं आंदोलन कडाक्याची थंडी आणि अवकाळी पावसातही सुरूच आहे. याच दरम्यान केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात आज पुन्हा एका बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं.

आंदोलनकर्ते शेतकरी आणि सरकार यांच्यातील ही सातवी बैठक होती. या बैठकीमध्ये तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, आजची चर्चा देखील निष्फळ ठरल्याचे समोर येत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अद्यापही तोडगा निघालेला नसून पुढील बैठकीत तोडगा निघेल असा विश्वास बठकीला उपस्थित केंद्रीय मंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

बैठकीनंतर केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले, ‘लागू करण्यात आलेल्या तीन कृषी कायद्यामधील तरतुदींवर शेतकरी नेते चर्चा करतील अशी अपेक्षा होती. मात्र, शेतकरी नेते कृषी कायदे रद्द करण्यावर अडून राहिले. पुढील बैठक ही ८ जानेवारी रोजी होणार आहे.

पुढे तोमर म्हणाले, ‘८ जानेवारीच्या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे. आजची चर्चा सौहार्दपूर्ण वातावरणात झाली, पण शेतकरी संघटना एका टप्प्यावर अडकली. शेतकऱ्यांशी झालेल्या चर्चेत कृषिमंत्री तोमर म्हणाले “टाळी दोन्ही हातांनी वाजते”, म्हणजेच दोन्ही बाजूंनी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.’

कृषीमंत्री म्हणाले की सरकारला शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती आहे. मात्र संपूर्ण देश डोळ्यासमोर ठेवूनच सरकार निर्णय घेईल. सद्यस्थितीत झालेल्या निदर्शनादरम्यान आपला जीव गमावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली देऊन बैठक सुरु करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!