Share

मंत्रालयाच्या गेटवर काळा झेंडा बाधण्याचा प्रयत्न करणारे मराठा आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

Published On: 

मुंबई – मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत आरक्षण देणारा राज्य सरकारचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवला. शिवाय आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारांना नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाचा या निकालाने मराठा समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटल्यात.

या मुद्यावरून सध्या महाराष्ट्रातील राजकारण देखील चांगलेच तापलेले आहे.सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाने पुन्हा मोर्चे काढण्याचा निर्धार केला आहे. तर दुसऱ्या बाजूला आज आंदोलनाच्या पवित्र्यात असणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मंत्रालयाच्या बाहेर मराठा आंदोलक आंदोलन करणार होते, परंतु आंदोलन करण्यापूर्वीच काही मराठा आंदोलकांना मनीष मार्केट परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे आंदोलक औरंगाबाद परिसरातील असल्याची माहिती समोर येत आहे. मराठा आरक्षण मुद्यावरून मराठा आंदोलक मंत्रालयाच्या गेटवर काळा झेंडा बांधणार होते. पण पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.

या आंदोलकांनी यावेळी केंद्र आणि राज्य सरकारचा तसेच सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचा निषेध केला सोबतच मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली. सध्या माता रमाबाई पोलीस स्टेशन मध्ये या आंदोलकांना नेण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!