🕒 1 min read
नवी-दिल्ली : एका समारंभादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चक्क काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे भरभरून कौतुक केले. त्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे. गुरुवारी (३० सप्टें.) राजस्थानमध्ये ४ वैद्यकीय महाविद्यालयांच्या पायाभरणीच्या व्हर्च्युअल समारंभात पंतप्रधान मोदी बोलत असतांना त्यांनी ‘राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे माझे चांगले मित्र आहेत’ असे वक्तव्य करत गेहलोत यांचे कौतुक केले.
यावेळी बोलत असतांना मोदी म्हणाले की,’मुख्यमंत्री गहलोत यांनी राज्यासाठीच्या विकासकामांची यादीच माझ्यासमोर ठेवली आहे. यामधून हे स्पष्ट दिसून येतं की, वेगवेगळ्या राजकीय विचारधारा असूनही त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. यासाठी मी अशोक गेहलोत यांचे आभार मानतो. मुख्यमंत्री गहलोत हे माझ्याशी खुल्या मनाने बोलले. कारण त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. तसेच ही मैत्री आणि विश्वासच हा लोकशाहीचा सर्वात मोठा विजय आहे’ असेही मोदी म्हणाले.
दरम्यान, पुढे बोलत असतांना मोदी म्हणाले की,’कोरोना महामारीने जगभरातील आरोग्य क्षेत्राबद्दल बरंच काही शिकवले आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक देश आपापल्यापरिने या संकटाला समोर जात आहे. दरम्यान, भारताने या काळात आपली शक्ती वाढवण्याचा आणि आत्मनिर्भर होण्याचा संकल्प केला आहे. राजस्थानमध्ये चार नवीन वैद्यकीय महाविद्यालयांचं बांधकाम सुरू होणं आणि जयपूरमध्ये पेट्रोकेमिकल्स संस्थेचे उद्घाटन हे याच दिशेने महत्वाचे पाऊल आहे.’
महत्त्वाच्या बातम्या
- ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याविरोधात आनंदराव अडसुळ यांची हायकोर्टात धाव
- धक्कादायक! नॅशनल बॅडमिंटनपटूचा राहत्या घराच्या छतावर संशयास्पद मृत्यू
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- वारी मार्गाचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावणार- अजित पवार
- नवऱ्याने मारहान करणे याला कौटुंबिक हिंसाचार म्हणतात हेच महिलांना माहित नाही; चित्रा वाघ

