मुंबई: शिवसेना (Shiv Sena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेविरोधातच बंड पुकारला आहे. सर्व आमदारांसोबत एकनाथ शिंदे गुवाहाटीला (Guwahati) दाखल झाले आहेत. या आमदारांमध्ये रोहयोमंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांचाही सहभाग आहे. त्यांनी प्रतिक्रिया देत मोठे वक्तव्य केले आहे.
“आमचे 40 आमदार एकत्र आलेत म्हणजे काहीतरी कारण असेलच ना? असा सवाल उपस्थित करत आता शिंदेसाहेब म्हणतील तेच आम्ही करु.”, असे संदीपान भुमरे यांनी म्हटले आहे. दरम्यान आज एकनाथ शिंदे गुवाहाटीवरून मुंबईला दाखल होणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र त्यापूर्वीच राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. शिंदे आज दुपारी राज्यपालांची भेट घेणार होते.
राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्याने राजकीय सूत्रे हालताना दिसून येत आहेत. भाजपसोबत सत्तास्थापन करण्यासाठी एकनाथ शिंदे आज राज्यपालांची भेट घेणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. मात्र आता यावर पाणी फेरल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान ४० आमदारांसह शिंदे यांनी एक वेगळा गट तयार केला आहे. ठाकरे सरकारला याचा मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Eknath Shinde : “गटनेतेपदाची झालेली निवड ही अवैध पद्धतीची” ; एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
- दिग्गज क्रिकेटर युवराज सिंगच्या मुलाचं नाव ऐकलं का? ५ महिन्यानंतर केला खुलासा!
- Eknath Shinde : एकनाथ शिंदेंवर आनंद दिघेंच्या कुटुंबाकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “गद्दारांना क्षमा नाही”
- Sanjay Raut : “गुजरातमध्ये जरूर दांडिया खेळा पण महाराष्ट्रात…”, संजय राऊतांचा टोला
- IPLच्या मार्केटबाबत पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, “हे सर्व…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

