Share

लग्नाचा कार्यक्रम असल्याची बतावणी करत मित्रानेच लांबवली कार

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : घरी लग्नाचा कार्यक्रम असल्याची बतावणी करुन दोन ते तीन दिवसांसाठी कार घेऊन गेलेला मित्र पुन्हा फिरकलाच नाही. हा प्रकार २३ मार्च रोजी बाबा पेट्रोल पंप परिसरात घडला.

सचिन रावसाहेब वखरे (३५, रा. पावर हाऊस, जटवाडा रोड, हर्सुल) यांचे सलून आहे. त्यांचा मित्र सोमनाथ रामभाऊ गायकवाड (रा. करोडी) याने घरी लग्नाचा कार्यक्रम असल्याचे सांगून दोन ते तीन दिवसांसाठी वखरे यांच्याकडे कारची मागणी केली होती.

त्यामुळे वखरे यांनी सोमनाथला विश्वासाने कार (एमएच-४८-ए-६५१६) दिली. मात्र, सोमनाथने कार परत आणून दिली नाही. त्यावरुन क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!