🕒 1 min read
Sanjay Raut | मुंबई : गेल्या महिन्यात राज्याच्या राजकारणात मोठा सत्ताबदल झाला. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तसेच सत्तेवर असलेले शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना विरोधात बसावं लागलं. मात्र शिंदे यांनी बंड केल्यापासून ते आता सरकार स्थापन झाल्यानंतर सुद्धा शिवसेना खासदार संजय राऊत हे त्यांच्यावर निशाणा साधून आहेत. संजय राऊत हे शिंदे सरकार टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरून राऊतांनी आता निशाणा साधलाय. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कायद्याला धरून झालेलंच नाही. कायद्याला धरून झालं असतं तर आतापर्यंत या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असता. पण तो झाला नाही. याचाच अर्थ कायद्याचा आणि घटनेचा काही तरी पेच निर्माण झाला आहे. नाही तर जे सरकार फक्त सत्तेसाठी निर्माण झालं आहे, असं राऊत म्हणाले.
जे आमदार केवळ मंत्रिपदासाठी फुटले आहेत ते इतके स्वस्थ का बसले असते? कारण त्यांना माहीत आहे. आपण शपथ घेतली तर आपली आमदारकी धोक्यात येईल आपलं सरकार धोक्यात येईल, म्हणूनच ते स्वस्थ आहेत. तर पुढे संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळेच राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Amol Mitkari : “बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात निधी द्यायचा पण…”, अमोल मिटकरींची शिंदे सरकारवर टीका
- Sanjay Raut । मला भविष्यात होणाऱ्या दुर्घटनाही माहिती आहेत – संजय राऊत
- Rohit Pawar : “केलेल्या कामाचं श्रेय घ्यायला हरकत नाही पण…”,रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
- Sadabhau Khot : “संधी साधून सोयीस्कर लाईव्ह येणारे उध्दव साहेब…”, सदाभाऊंचा अजित पवारांवर निशाणा
- Sanjay Raut : “केसरकर, उदय सामंत पवारांच्याच शाळेचे प्रमाणपत्र घेऊन..”, संजय राऊतांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
