Share

Sanjay Raut : “केसरकर, उदय सामंत पवारांच्याच शाळेचे प्रमाणपत्र घेऊन..”, संजय राऊतांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेनेशी बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज्यात शिंदे सरकार स्थापन केले. यानंतर शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांकडून आता एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामना रोखठोक मधून शिंदे गटातील दीपक केसरकर आणि उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे.

शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी केली हे शिंदे गटातील काही म्होरक्यांना पटले नाही व त्यांनी हा दिव्य विचार जाहीरपणे बोलून दाखवला, पण त्यांचे ज्ञान कच्चे आहे. 2019 साली भाजपनेच राष्ट्रवादीबरोबर आघाडी करून सरकार स्थापनेचे प्रयत्न केले. शिंदे फुटले तसे तेव्हा राष्ट्रवादीचे अजित पवार फुटले. राष्ट्रवादीबरोबर भाजपचे सरकार स्थापन केलेच जाणार होते, पण म्हणून राष्ट्रवादीमुळे भाजप संपला किंवा संपेल अशी बोंब भाजप आमदारांनी मारली नाही. भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार तेव्हा आले असते तर ती काय नैसर्गिक युती होती? राजकारणात नैसर्गिक व अनैसर्गिक असे काहीच नसते.

2014 साली भाजप व शिवसेना स्वतंत्रपणे विधानसभा लढले. निकालानंतर सरकार स्थापनेस विलंब झाला तेव्हा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्वत समोर येऊन सरकार स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा जाहीर केला व भाजपने हा पाठिंबा तेव्हा नाकारला नव्हता. भाजपला व श्री. मोदी यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस व श्री. शरद पवार यांचे वावडे कधीच नव्हते. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जे आमदार शिंदे गटात गेले, त्यातील दीपक केसरकर, उदय सामंत हे आमदार तर पवारांच्याच शाळेचे प्रमाणपत्र व दाखला घेऊन शिवसेनेत आले. त्यांना राष्ट्रवादीचा इतका द्वेष का असावा? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

 महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!