Share

Amol Mitkari : “बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात निधी द्यायचा पण…”, अमोल मिटकरींची शिंदे सरकारवर टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळ बैठकीत मविआ सरकारच्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली आहे. तर काही निर्णयांवर पुनर्विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून मविआ नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी थेट निधीवरून शिंदे सरकारवर टीका केली आहे.

“आपल्या बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात निधी द्यायचा आणि उर्वरित मतदार संघातील निधीला स्थगिती त्यातही मातोश्री पाणंद रस्ते योजना अशा ज्या महत्त्वाच्या शेतकरीहिताच्या योजना आहेत त्याला स्थगिती देऊन नेमकं काय साध्य करायचं आहे?”, असा सवाल अमोल मिटकरी यांनी केला आहे.

तसेच विकास कामांना स्थगिती देणे हा निर्णय जनतेच्या दृष्टीने अत्यंत चुकीचा आहे. मागच्या काळात अर्थमंत्री अजितदादा यांनी नगर विकास खात्याला 21000 कोटीचा निधी दिला होता. बंडखोर आमदार शहाजी बापूंना सुद्धा कोट्यावधीचा निधी मिळाला. सत्तेचा ताम्रपट कायमस्वरूपी नसतो. असा टोला मिटकरी यांनी हाणला आहे.

रोहित पवारांच्या मतदारसंघातील ‘त्या’ निर्णयाला स्थगिती-

माझ्या मतदारसंघातील पक्षकारांची ‘तारीख पे तारीख’ या त्रासातून सुटका व्हावी आणि वकीलांचीही सोय व्हावी म्हणून गेली दोन-अडीच वर्षे पाठपुरावा करुन मविआ सरकार असताना मी कर्जतला दिवाणी न्यायालय मंजूर करुन आणलं. पण या सरकारने सत्तेत येताच या निर्णयाला स्थगिती दिली.”, असा संताप व्यक्त करत राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

“कदाचित, राज्य पातळीवरील मोठ्या निर्णयांना स्थगिती देताना तालुका पातळीवरील दिवाणी न्यायालयासारख्या छोट्या निर्णयालाही स्थगिती देण्याचा निर्णय अनावधानाने झाला असावा. त्यामुळं माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, याबाबत आपण व्यक्तिशः लक्ष घालून या निर्णयावरील स्थगिती उठवावी.”, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!