🕒 1 min read
पुणे : कोरोनाच्या संकटात देखील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. विरोधी पक्ष भाजप राज्य सरकारवर टीका करण्याची एक संधी सोडत नसल्याचं दिसत आहे. तर सत्ताधारी देखील आपल्या शैलीत विरोधकांना उत्तर देत आहेत.
एकीकडे कोरोना, लॉकडाऊन, रेड झोन, नियम-अटी या सगळ्या धबडग्यात राज्यातली जनता व्यस्त असताना दुसरीकडे राज्यात लवकरच एक राजकीय भूकंप होईल का? अशा प्रकारच्या चर्चांना उधान आल्याचे दिसून येत आहे. विरोधी पक्षांकडून सातत्याने सरकार निष्क्रीय असल्याचे होणारे आरोप , केंद्रात सत्तेत आणि राज्यात विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून राज्यात केलेले सरकारविरोधी आंदोलन, केंद्रसरकार व राज्यसरकार यांच्यात समन्वय नसल्याचे निर्माण झालेले चित्र, सरकारच्या कारभाराबाबत सातत्याने राज्यातील विरोधीपक्ष नेत्यांनी राज्यपालांची घेतलेली भेट, याच बरोबर संजय राऊत, शरद पवारांनी घेतलेल्या राज्यपालांच्या भेटीचे अनेक तर्कविर्तक काढले जात आहेत.
आम्ही पाठिशी मजबूत उभे आहोत,ठाकरे सरकार स्थिर आहे : शरद पवार
दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे भाजपाचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी राज्यपालांची भेट घेवून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केलेली मागणी यातून केंद्रात याबाबत काही पडद्द्यामागून खलबते तर चालू नाहीत ना? याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.
राणेंनी घेतलेल्या भेटीच्या आणि त्यांनी केलेल्या आरोपांच्या तोफांचे आवाज शांत होत नाहीत तोपर्यंतच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणाऱ्या खासदार नारायण राणे यांना त्यांच्याच पक्षाने झटका दिला आहे. कारण नारायण राणेंने केलेली राष्ट्रपती राजवटीची मागणी ही भाजपची अधिकृत भूमिका किंवा मागणी नाही, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं. ‘राणेंची राष्ट्रपती राजवटीची मागणी ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही. तशी मागणी भाजपने केलेली नाही. ती राणेंची वैयक्तिक मागणी आहे’, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे…
मुनगंटीवार यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे नारायण राणे अक्षरशः तोंडघशी पडणार अशी शक्यता झाली आहे. राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात राणेंनी घाई केली का असा देखील सवाल आता उपस्थित होत आहे. आता भाजप यापुढे काय रणनीती आखणार याकडे देखील सर्वांचे लक्ष असणार आहे.
कोरानाचं संकट हाताळण्यात सपशेल अपयशी, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा : राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
