🕒 1 min read
मुंबई: मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आली असताना गुरुवारी पालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पावर ‘जुमले का अर्थसंकल्प’ अशी टीका विरोधकांतून होत आहे. यावर माजी मंत्री तथा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याऐवजी शिवसेनेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याच्या उद्देशाने सादर केलेला हा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आहे. अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याऐवजी शिवसेनेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याच्या उद्देशाने सादर केलेला हा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आहे..! #mumbaibadget pic.twitter.com/5ZAszGI6QI
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) February 4, 2022
याबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विट केले आहे. मुनगंटीवार म्हणाले, मुंबईतील जनता अनेक संकटाचा सामना करत आहे, तुम्ही बाईकवरुन २० किलोमीटर प्रवास केल्यास काय परिस्थिती आहे हे तुमच्या लक्षात येईल, पण मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. मात्र पावसाळ्यात या शहरात जागोजागी पाण्याचे डबके साचलेले दिसून येतात. विकासासाठी काही कालावधी जातो हे मीही समजू शकतो पण शिवसेनेने २५ वर्ष सत्ता उपभोगली, तरीही शहरातील साध्या रस्त्याचा विकास शिवसेना करु शकली नाही.
मुंबई महापालिकेने रस्त्यासाठी २३ हजार कोटी रुपये खर्च केले. पण रस्त्यावरुन जाताना आमची गाडी सायलेंट मोडवर जात नाही तर व्हायब्रेट मोडवर जाते. जगामध्ये इतर कोणत्याही महानगराचे रस्ते तुम्ही बघा आणि मुंबईचे रस्ते बघा. मुंबईतील रस्ते बघून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न पडल्याशिवाय रहाणार नाही. असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
