Share

कोरानाचं संकट हाताळण्यात सपशेल अपयशी, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा : राणे

Published On: 

मुंबई : ‘उद्धव ठाकरे सरकार हे कोरानाचं संकट हाताळण्यात सपशेल अपयशी ठरलं आहे. हे संकट हाताळण्याची या सरकारची क्षमता नाही. त्यामुळे राज्यपालांनी या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट लागू करावी,’ अशी मागणी खा. नारायण राणे यांनी या भेटीदरम्यान केली.

राज्यात कोरोनानं अक्षरश: कहर केला असताना दुसरीकडे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी त्यांनी आज राज्यपालांची भेट घेतली.मुंबईसह राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढतच आहेत. मुंबई महापालिका प्रशासनाकडे नियोजनाचा अभाव आहे. त्यामुळे सर्व वैद्यकीय सेवा, रूग्णालय लष्कराच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत नारायण राणे यांनी मुंबई महापालिका आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

पुढे बोलताना राणे म्हणाले, राज्यात अनेकांनी उपासमार होत नाहीत. रोजगार उपलब्ध नाहीत. शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे. ही परिस्थिती सरकारला हाताळता आलेली नाही.राज्याला आतापर्यंत केंद्र सरकारने भरपूर मदत केली. मात्र तरीही राज्यातील नेते केंद्र सरकारवर नुसती टीका करत आहेत. सरकारी यंत्रणा कशी हाताळावी हे ज्यांना कळतं त्यांनी करावं, मात्र तसं केलं जात नाही. नाचता येईना, अंगण वाकडे अशी महाविकास आघाडी सरकारची परिस्थिती आहे, असा आरोप नारायण राणेंनी केला.

नांदेड मध्ये उपचार चांगले नाहीत का? मनसेचा खोचक सवाल

दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप नेत्यांच्या राजभवनातील चकरा वाढल्या आहेत. त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेलं बैठकीचं आमंत्रण, त्यात मिलिंद नार्वेकर यांची हजेरी पाहायला मिळाली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील राज्यपालांची घेतलेली भेट घेतली. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी स्वत: राज्यपालांची भेट घेतली आहे.

‘विद्यार्थांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही’ – शिक्षण मंत्री उदय सामंत

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!