टीम महाराष्ट्र देशा: अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी शुक्रवारी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना इशारा दिला की जर चीनने युक्रेनियन शहरांवर हल्ले करणार्या रशियाला मदत करण्याचा निर्णय घेतला तर त्याचे बीजिंगवर परिणाम होतील. ही माहिती व्हाईट हाऊसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, चर्चेत जिनपिंग यांनी स्पष्ट केले की अमेरिका आणि चीनमध्ये मतभेद आहेत आणि ते नेहमीच असतील, परंतु हे मतभेद नियंत्रणात ठेवणे खूप महत्वाचे आहे. व्हाईट हाऊसच्या अधिकार्यांनी सांगितले की अध्यक्ष बायडन यांनी रशियावर निर्बंध घालण्याबरोबरच रशियाचे हल्ले रोखण्यासाठी आणि त्यांना प्रतिउत्तर देण्याच्या उपायांची रूपरेषा सांगितली आहे. युक्रेनवर हल्ला करण्यासाठी चीनने रशियाला मदत केल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात हेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
बायडन प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बीजिंगवर काय परिणाम होतील सांगण्यास स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले, मी आमचे पर्याय सार्वजनिकपणे जाहीर करणार नाही. यादरम्यान बायडन यांनी जिनपिंग यांना हे देखील सांगितले की, ‘आम्ही इथपर्यंत का पोहोचलो, आम्ही कोणती पावले उचलली, आम्ही या पातळीपर्यंत का गेलो आहोत’ या चर्चेदरम्यान बायडन यांनी जिनपिंग यांना पुतिन यांच्याद्वारे करण्यात आलेल्या कृती अमेरिकेच्या दृष्टिकोनातून समजावून सांगितल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

