Share

“मी ठरवलं की नंबर 1 येतोच”- देवेंद्र फडणवीसांच अप्रत्यक्ष आव्हान

Published On: 

🕒 1 min read

मावळ : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मावळ तालुक्यातील इंदोरी गावात बैलगाडा शर्यतीला उपस्थिती लावली होती. शिवजयंतीच्या निमित्ताने या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीत एकूण २३१ बैलगाडयांनी सहभाग घेतला होता. यावेळी फडणवीसांचे जंगी स्वागत झाले. तसेच फडणवीसांनी शर्यत पाहण्याचा आनंद देखील लुटला. त्याचबरोबर महाविकास आघाडीला चिमटे देखील काढले.

दरम्यान फडणवीस शेतकऱ्याचा मित्र असणाऱ्या बैलांचे आभार मानत म्हणाले कि, “बैलगाडा शर्यतीवर बंदी आणणाऱ्यांनी एकदा मावळात येऊन पाहावे. भाजपच सरकार आलं आणि आम्ही प्रयत्न करत बैलगाडा शर्यत सुरू केली. मात्र हे पुन्हा कोर्टात गेले आणि शर्यतीवर बंदी आणली. मी त्यावेळी एक समिती निर्माण केली आणि बैल हा धावणारा प्राणी आहे, असे म्हणून कागदपत्रे कोर्टात देत ही बंदी उठवली”

“मी ठरवलं की नंबर 1 येतोच. महाविकास आघाडीचे नेते मात्र तीन मार्कशीट जूळवून पहिले आले. जनतेने आम्हाला 2014 आणि 2019ला देखील पहिलं आणलं होत. पण काहींनी शाळा केली. मात्र मावळच्या धर्तीवर ज्याचा बैलगाडा पहिला आला, तो कधीच मागे हटत नाही”, असे म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडीला अप्रत्यक्ष रित्या आव्हानच दिले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!