Share

“अफजल गुरुला फाशी देऊ नको म्हणणाऱ्या मेहबुबा…”, उद्धव ठाकरेंचा घणाघात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:  एमआयएमने महाविकास आघाडीला आघाडीची ऑफर दिली आहे. यावरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. औरंगजेबाच्या थडग्यावर डोकी टेकतात त्यांच्यासोबत मेलो तरी जाणार नाही इतकी कडवट निष्ठा असताना उगाच हा मुद्दा काढायचा आणि आम्ही हिंदुत्वापासून दूर चाललो आहोत हे दाखवायचं. आम्ही काय मूर्ख नाही. आम्ही भाजपासारखं सत्तेसाठी लाचार नाही. आम्ही एमआयएमसोबत जाणं शक्य नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

तसेच अफजल गुरुला फाशी देऊ नको म्हणणाऱ्या मेहबुबा मुफ्तीसोबत सत्तेसाठी मांडीघाशी केली तितका निर्लज्जपणा शिवसेनेत येणं शक्य नाही. मी तो कदापि येऊ देणार नाही. सत्ता मिळत असली तरी एमआयएमसोबत जाणार नाही, असे स्पष्टपणे उध्व ठाकरे यांनी सांगितले आहे. दरम्यान एमआयएमने दिलेल्या ऑफर नंतर भाजपने शिवसेनेला निशाण्यावर धरले आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी उत्तर देत भाजपला चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या सर्व खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना संबोधित करतात याबाबत वक्तव्य केले. राज्यात शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी तसंच राज्यात गेल्या अडीच वर्षात शिवसेनेनं केलेल्या आणि करत असलेल्या विकासात्मक कामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी शिवसेनेनं ‘शिवसंपर्क अभियान’ सुरू केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!