🕒 1 min read
मुंबई: एमआयएमने महाविकास आघाडीला आघाडीची ऑफर दिली असल्याने राजकारणात एकाच चर्चा रंगली आहे. यावरून भाजपने शिवसेनेला धारेवर धरले असतानाच आता शिवसेना प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. काही कारण नसताना एमआयएमने महाविकास आघाडीला आघाडीची ऑफर दिली आहे. काही संबंध आहे का? हाच खऱा डाव आहे. एमआयएने ऑफर द्यायची आणि मग नंतर भाजपाने यावरुन टीकेचा भडीमार सुरु करायचा. औरंगजेबाच्या थडग्यावर डोकी टेकतात त्यांच्यासोबत मेलो तरी जाणार नाही इतकी कडवट निष्ठा असताना उगाच हा मुद्दा काढायचा आणि आम्ही हिंदुत्वापासून दूर चाललो आहोत हे दाखवायचं. आम्ही काय मूर्ख नाही. असा टोला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपला लगावला आहे.
तसेच शिवसेना मुस्लीमधार्जिणी झाल्याचं म्हणत आहेत. मी काही मोहन भागवत यांची वाक्यं घेऊन बसलो आहेत. जर मला जनाब म्हणणार असाल तर तुमच्या सरसंघचालकांना काय बोलणार आहात? मोहन भागवतांच्या नावापुढे खान किंवा जनाब जोडणार आहात का? आधी हिंदुत्व काय ते समजून घ्या, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तसेच मोहन भागवतांच्या वक्तव्यावर मोदी, अमित शाह आणि ज्यांच्या तोंडातून गटारगंगा वाहत असते ते उत्तर देऊ शकतात का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
दरम्यान शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या सर्व खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना संबोधित करतात याबाबत वक्तव्य केले. राज्यात शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी तसंच राज्यात गेल्या अडीच वर्षात शिवसेनेनं केलेल्या आणि करत असलेल्या विकासात्मक कामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी शिवसेनेनं ‘शिवसंपर्क अभियान’ सुरू केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “आपण मराठी आहात तर मराठीतच बोलूया ना..” अक्षय कुमारचा व्हिडीओ होतोय व्हायरल
- “जनाब सेना कोण हे महाराष्ट्राला सांगू”- संजय राऊतांचा इशारा
- “नाथा भाऊंच्या विषयी आमच्या मनात आदरच आहे” – चंद्रकांत पाटील
- ‘द कश्मीर फाइल्स’ विषयी ‘कंगना रणौत’ म्हणाली, भारताच्या इतिहासातील….
- “AIMIM कडून आलेली ऑफर भाजपच्या कटाचा भाग”- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
