🕒 1 min read
लासलगाव : कृषी धोरण 2020 या योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी महावितरणच प्रयत्न करत आहे. योजनेत सहभाग घेतला तर शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. तसेच ही योजना काय आहे याची माहिती शेतकऱ्यांना मिळावी यासाठी निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत उपविभागातील पिंपळगाव,खेडेगाव,वरखेडा,चिंचखेड,पालखेड ,शिरवाडे वणी, कोकणगाव, साकोरा अशा 38 गावांमधून 70 ते 80 महावितरण अधिकारी कर्मचारी यांनी मोटारसायकल रॅली काढून जनजागृती केली.
कृषीपंपासाठी ही योजना असली तरी फार पूर्वीची थकबाकी वसुल करुन शेतकऱ्यांना चालू बिलापर्यंत आणण्यासाठी ही योजना राबवली जात आहे. यामध्ये सप्टेंबर 2020 अखेर असलेल्या थकबाकीतील दंड-व्याज माफ करून, व्याजाचे पुनर्गठन करून, वीज बिलाची दुरुस्ती करून सुधारित थकबाकी निश्चित केली आहे. त्यानुसार सुधारित थकबाकीवर 50 टक्के माफी देऊन उर्वरीत 50 टक्के वसुल करुन थकबाकीमुक्त करण्याचे धोरण आहे.
तसेच वसुल झालेल्या रकमेपैकी 66 टक्के ही ‘कृषी आकस्मिक निधीतून’ वीज यंत्रणेतील विकास कामांवर खर्च केला जाणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांनी 50 टक्के रक्कम अदा करुन त्या रकमेचा वापर हा शेतकऱ्यांना सुरळीत विद्युत पुरवठा करण्यासाठी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी थकीत वीजबिल अदा केले तरी त्याचा उपयोग शेतकऱ्यांसाठीचं होणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
