Share

‘ग्रीन लातूर’साठी वृक्षलगवडीचा मास्टर प्लॅन तयार करा’, पालकमंत्री देशमुखांचे निर्देश

Published On: 

लातूर: राज्यात प्रतिवर्षी दहा कोटी वृक्ष लागवड करण्याचे शासनाने उद्दिष्ट ठरवले असून त्या अनुषंगाने लातूर जिल्ह्याला ४३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट मिळाले असले तरी जिल्हा प्रशासनाने उद्दिष्टापेक्षा अधिक काम करून ग्रीन लातूर जिल्हा निर्माण करण्यासाठी तालुकानिहाय वृक्षलगवडीचा मास्टर प्लॅन तयार करावा व त्यानुसार वृक्षलागवड करून अंमलबजावणी करावी. लातूर जिल्ह्याचे वन क्षेत्र वाढवावे व “ग्रीन लातूर जिल्हा” हा वेगळा पॅटर्न निर्माण करावा, असे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित वन विभाग सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्ष लागवड मोहीम आढावा प्रसंगी पालकमंत्री देशमुख बोलत होते. जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी त्यांच्याकडील जमिनीवर बांबू लागवडीचे किमान २ हेक्टर क्षेत्रावर डेमो प्लांट तयार करावेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने त्यांना सहकार्य करावे. बांबू हे कॅश क्रॉप पीक असून त्यापासून फर्निचर व एथोनॉल मध्येही उपयोग होणार असल्याचे बोलले जात आहे त्यानुसार शेतकऱ्यांना याबाबत माहिती देऊन बांबूची लागवड करण्यासाठी प्रोत्साहित करावे. त्याप्रमाणेच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या बांबूसाठी वन विभागाने खरेदीदार ही उपलब्ध करून द्यावा, असेही त्यांनी यावेळी सूचित केले.

वन अधिकारी गायकर यांनी राष्ट्रीय बांबू मिशन अंतर्गत जिल्ह्यात बांबू लागवड सुरू असल्याची माहिती दिली लातूर जिल्ह्याला यावर्षी वृक्षलागवडीचे ४३ लाख १८ हजार चे उद्दिष्ट असून त्यातील २१ लाख ७०० वृक्षाची लागवड वन विभागामार्फत करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. लातूर जिल्ह्याचे वनक्षेत्र १ टक्का असून ते वाढविण्यासाठी वन विभागामार्फत प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या राष्ट्रीय बांबू मिशन अंतर्गत जिल्ह्यात फक्त ६२ हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली दिसून येत आहे. तरी कृषी विभाग व वन विभागाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून देवणी, शिरूर अनंतपाळ, जळकोट व रेणापूर या छोट्या तालुक्यांना ५०० एकर बांबू लागवडीचे उद्दिष्ट द्यावे तर उर्वरित सर्व तालुक्यांना किमान एक हजार एकर क्षेत्रावर बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात यावे,असे पालकमंत्री देशमुख यांनी निर्देशित केले. तसेच आपण स्वतः आपल्या शेतात दोन एकर क्षेत्रावर बांबू लागवड करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

वन विभागाने लातूर जिल्ह्यातील वनाच्छादित क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. वनविभागाच्या साखरा येथील जमिनीवर फॉरेस्ट पार्क उभारण्याबाबत चे नियोजन करून त्याचा आराखडा सादर करावा. तसेच जिल्ह्यात इको टुरीझम अंतर्गत काही भागावर लोकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. लातूर जिल्ह्यातील नव्याने तयार होणारे सर्व पानंद रस्ते नवीन पक्के रस्ते राष्ट्रीय महामार्ग त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग वन विभाग सामाजिक वनीकरण विभागाने पुढाकार घ्यावा लातूर जिल्हा वनाच्छादित करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी केले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!