Share

पुण्यात आजही कोरोनामुक्तांपेक्षा नव्या कोरोना बाधितांची संख्या अधिक !

Published On: 

🕒 1 min read

पुणे : रोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण नोंदवले जात आहेत. दरम्यान, पुणे शहरात एप्रिल महिन्यात दररोज पाच ते सात हजार रुग्णांची वाढ होत होती. यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यासाठी देखील ही बाब गंभीर होती. यानंतर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने घसरल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला.

१४ जूनपासून शहरात निर्बंध अधिक शिथिल झाले असून पुणे आता पूर्वपदावर येत आहे. अशातच कोरोनाचा धोका हा पूर्णपणे टळला नसून योग्य खबरदारी घेणं आवश्यक आहे. यामुळे वीकेंड म्हणजेच शनिवार आणि रविवारी पुणे शहरात निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. गेल्या तीन दिवसांमध्ये रोज नव्या कोरोना रुग्णांच्या आकड्यात वाढ होत होती. आज नव्या कोरोना रुग्णांच्या आकड्यात किंचित घट झाली असली तरी कोरोनामुक्तांच्या तुलनेत ही संख्या अधिकच आहे.

शहरात आज नव्याने २५८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ७७ हजार ०८४ इतकी झाली आहे. तर, २४६ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ६६ हजार ००२ झाली आहे.

दरम्यान, पुणे शहरात उपचार घेणाऱ्या २ हजार ५२२ रुग्णांपैकी ३१४ रुग्ण गंभीर तर ४४३ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. आज कोरोनाने ६ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!