मुंबई : कोरोना रोगाने गेल्यावर्षीपासून देशासह जगभरात थैमान घातला आहे. अनेक देश या रोगातून सावरत असून भारताला दुसऱ्या लाटेचा फटका बसला. कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्याहून अधिक भयंकर होती. या लाटेचे सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात दिसून आले. राज्यातील स्थिती आता आटोक्यात येत असून अद्यापही अनेक जिल्ह्यांमध्ये चिंता कायम आहे.
दरम्यान, दुसरी लाट पूर्णपणे ओसरण्याआधीच तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. तसेच, या लाटेत बालकांना अधिक धोका असल्याचं सांगण्यात येत आहे. केंद्र सरकारसह राज्य सरकारने यावेळी खबरदारी म्हणून तिसऱ्या लाटेआधीच तयारी सुरु केली आहे. दरम्यान आता राज्यात कोरोनाची तिसरी लाट आल्यास त्यात किमान 50 लाख जणांना संसर्ग होण्याची अटकळ राज्याच्या आरोग्य खात्याने बांधली आहे. त्यातील किमान 25 लाख जणांना शासकीय रुग्णालय आणि कोरोना केंद्रात उपचार करावे लागतील, असेही अनुमान काढण्यात आले आहे.
तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी सरकारचे काटेकोर नियोजन सुरू आहे. या 50 लाख बधितांमध्ये पाच लाख बालके असण्याची शक्यता असून त्यातील अडीच लाख जणांना उपचाराची गरज भासू शकते. त्यापैकी साडेतीन टक्के म्हणजे आठ हजार 740 बालकांना बालरोग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करावे लागतील, असा अंदाज बांधण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात आलेल्या या आढाव्यात या माहितीचा समावेश आहे. आणखी दोन तीन सादरीकरणाचा अभ्यास केल्यानंतर तिसऱ्या लाटेच्या नेमकेपणाने अंदाज येऊ शकेल. मात्र टास्क फोर्सने सुचवल्याप्रमाणे आम्ही तयारी सुरू केली आहे, असे राज्याचे आरोग्य आयुक्त एन. रामस्वामी यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आरक्षण, संविधान आणि लोकशाही संपवणे हा आरएसएसचा उद्देश’, नाना पटोलेंची टीका
- गंभीर! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल ७७६ डॉक्टरांनी गमावला जीव
- मोठी बातमी! डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अनलॉक नियमावलीत महत्त्वपूर्ण बदल
- धक्कादायक! माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांचे ट्विटर अकाऊंट ब्लॉक
- ‘गोपीनाथ मुंडे नसले तरी त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय’, पंकजा मुंडेंचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
