जालना: जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत आहे, एकूण परिस्थिती लक्षात घेता लवकरच जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा होणार हे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या आदेशानुसार एमआयडीसीतील चार स्टील कारखान्यांमधील ऑक्सिजन प्लँट बुधवारी सील केले आहेत. जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी तहसीलदार श्रीकांत भुजबळ, अन्न व औषधी विभागाच्या निरीक्षक अंजली मिटकरी यांना सोबत घेऊन काल बुधवारी दुपारी जालना शहरातील नवीन औद्योगिक वसाहतीत चार स्टील कारखान्यांमध्ये असलेले ऑक्सिजन प्लँट सील केले आहेत. याशिवाय याच औद्योगिक वसाहतीत असलेल्या ऑक्सिजनच्या दोन कारखान्यांना भेट देऊन ऑक्सिजन निर्मितीची पाहणी केली.
या दोन्ही कारखान्यांमध्ये तयार होणारा ऑक्सिजन इतरत्र कुणालाही पुरवठा करू नये अशी सूचना जिल्हाधिकारी बिनवडे यांनी संबंधित कारखाना मालकांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. ऑक्सिजन तयार करणाऱ्या या दोन्ही कारखान्यांमधून ऑक्सिजन पुरवठा केला जाऊ नये यासाठी जिल्हाधिकारी बिनवडे यांनी दोन पथके या कारखान्याजवळ नियुक्त केली आहेत.
- महाराष्ट्र ठरणार लस निर्मिती करणार पहिलं राज्य; हाफकिन संस्थेला केंद्राकडून परवानगी
- ‘खंडण्या गोळा करायला जशी यंत्रणा कामाला लावली, तशी आरोग्य यंत्रणा कामाला लावली असती तर…’
- भाजपचा आमदार फुटून पोटनिवडणूक लागली तर आश्चर्य वाटून घेऊ नये; जयंत पाटलांच सूचक विधान
- अजित पवारांच्या सभेत स्टेजवर हजेरी लावणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्याचे कोरोनाने निधन !
- सरकार कधी अन् कसं पडणार हे अजितदादांना माहिती आहे – चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

