Share

आजपासून ३ जूनपर्यंत राज्यात वादळी वाऱ्यासह बरसणार मान्सूनपूर्व पावसाच्या सरी

Published On: 

मुंबई : राज्यात पुढील चार दिवस हवामान खात्यानं पावसाचा इशारा दिलाय. महाराष्ट्रातील विविध भागात रविवारी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली होती. हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी आज महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे आणि पालघर या भागात पावसाच्या सरी बरसतील, अशी माहिती दिली आहे. राज्यावरती कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय, त्यामुळे पश्चिम बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर बाष्प निर्माण होतंय, त्यामुळेच राज्यात पावसाची शक्यता आहे.

उकाड्याने हैराण झालेल्या राज्यातील नागरिकांना लवकरचं दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण येत्या पाच दिवसांत राज्यांतील विविध जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. यात गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाच्या सरी कोसळण्यास सुरु झाली आहे.

त्यामुळे कोकण, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांमध्ये येत्या ५ दिवसांत मान्सूनचे दमदार आगमन होणार असून नागरिकांना विजांच्या गडगडाटासह हलक्या आणि मध्यम स्वरुपाच्या पाऊसाचा सरी अनुभवता येणार आहे. वादळी वाऱ्यासह बरसणारा हा पाऊस राज्यात पुढील ४ दिवस म्हणजेच ३१ मेपासून ते ३ जूनपर्यंत सक्रिय राहिल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

ढगाळ वातावरण तयार झाले असून पुढील २४ तासांत पालघर, ठाणे, धुळे, नागपूरमध्ये हलका पाऊस होईल. मात्र उर्वरित महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचे अंदाज आहे. या भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

दरम्यान, स्कायमेटच्या अंदाजानुसार जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चार महिन्यांत सरासरीच्या बीबीएम .6 मिमीच्या तुलनेत 2021 मध्ये 103 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये 5 टक्के कमी किंवा अधिक असू शकते. पावसाळ्याच्या प्रादेशिक कामगिरीवर स्कायमेटचा अंदाज आहे की उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागांत संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!