🕒 1 min read
बीड: जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रभाव बघता लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सर्वच गोष्टी बंद राहणार आहेत. त्यातच बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरु आहेत, बीड जिल्ह्यात २६ मार्च ते ४ एप्रिल लॉकडाऊन आहे तथापि या काळातील सर्व पेपर संबधित महाविद्यालयात होणार आहेत.अशी घोषणा करण्यात आली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील पदवी अव्यावसायिक अभ्यासक्रम अभ्यासक्रमांच्या परीक्षा १६ मार्च पासून सुरु झालेल्या आहेत. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील बीड, जालना, उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्हयात सदर परीक्षा होत आहेत. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने सदर परीक्षा होत आहेत.
जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, बीड यांनी पत्र क्र.१ नुसार बीड जिल्ह्यासाठी दि.२५ मार्चच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लागू केलेला आहे. सद्या विद्यापीठाच्या विविध पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरु आहेत. सदर परीक्षा या पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे सुरु राहतील. त्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा नियमित होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ना रहाणे, ना स्मिथ, युवा खेळाडूकडे असेल दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधार पदाची धुरा
- ‘केंद्रातील सरकारचे इंधन दरवाढीबाबतचे धोरण ‘हाताची घडी तोंडावर बोट’ असेच राहिले आहे’
- आयपीएलमध्ये जडेजाचा सहभाग? सीईओने दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- भारत-इंग्लंडचा आज दुसरा वनडे सामना ; सूर्यकुमारला पदार्पणाची संधी?
- अर्जून तेंडुलकर आयपीएलसाठी सज्ज! मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
