बीड: मागील काही दिवसांपासून महावितरणकडून शेतकऱ्यांची वीज खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. या कारवाईमुळे नागरिक आणि बळीराजा दोघेही त्रस्त असल्याचे चित्र आहे. एक तर आधीच संचारबंदी त्यात वीज खंडित करण्याचा प्रकार यामुळे शेतकऱ्याला दुहेरी मर सहन करावा लागत आहे.त्यामुळे तालुक्यातील नागरिक आणि आमदार लक्ष्मण पवार आक्रमक झाल्याचे चित्र आहे. तोडलेले कनेक्शन तात्काळ जोडावेत, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा आ.लक्ष्मण पवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिला आहे.
जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कोरोनो नियञंणात आणण्यासाठी लोकांनी घरात थांबने आवश्यक आहे तर लोकांना घरात थांबण्यासाठी लाईटची गरज आहे. लॉकडाऊनच्या काळात विज वितरण कार्यालयाने कोणाचेही विज कनेक्शन तोडू नये, तसेच ज्यांचे विज कनेक्शन तोडले आहे, त्याचे विज कनेक्शन तात्काळ जोडुन द्यावे नसता आदोलन करण्यात येईल, असा इशारा आ.लक्ष्मण पवार यांनी जिल्हाधिकारी यांना पञाद्वारे दिला आहे.
बीड प्रशासनाने दि.२६ मार्च ते ४ एप्रिल असा दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन घोषीत केला आहे. विज वितरण कार्यालयाने अनेक गावांचे विज कनेक्शन तोडलेले आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात नागरिक कसे राहतील असा प्रश्न विचारला आहे. आपण लॉकडाऊनच्या काळात कोणाचेही विज कनेक्शन तोडु नये, नसता आदोलन करण्यात येईल असा इशारा आ.लक्ष्मण पवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पञात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बाळासाहेबांचा शिवसैनिक उभा आहे, चौकशीची मागणी मीच करतोय- अरविंद सावंत
- सदाबहार, ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर !
- मराठा आरक्षण : अखेर मुख्यमंत्र्यांनी घेतली साष्टपिंपळगाव ग्रामस्थांची भेट
- भारत बंद : शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी पटोले काँग्रेस नेते-मंत्र्यांसह करणार उपोषण
- शिमग्याला घरोघरी देवांची पालखी नेण्यास बंदी; होळीसाठी नियमावली जाहीर !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

