पुणे : इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा ६६ धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. सामना गमावल्यांनंतर इंग्लडला आणखीन एक मोठा धक्का बसला. 0-1 ने पिछाडीवर असलेल्या इंग्लंड संघाला आगामी दुसऱ्या सामन्यापूर्वी धक्कादायक माहिती समोर जावे लागले.
संघाचा कर्णधार इयन मॉर्गन आणि फलंदाज सॅम बिलिंग्ज यांना पहिल्या सामन्यात फिल्डिंग दरम्यान दुखापत झाली ज्यामुळे दुसर्या वनडे सामन्यात दोघांच्या खेळण्याबाबत शंका निर्माण झाली. कर्णधार मॉर्गनच्या उजव्या हाताच्या अंगठा व बोटाला दुखापत झाली होती, ज्यानंतर त्याला चार टाके घालावे लागले. दुखापतीमुळे इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन मालिकेबाहेर गेला. त्याच्या जागी लियाम लिव्हिंगस्टोन खेळेल, अशी माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून देण्यात आली. त्यानंतर या संधीसाठी पूर्णपणे तयार असल्याचं लिव्हिंगस्टोनने म्हटलंय.
दुखापतीमुळे मालिकेबाहेर गेलेल्या कर्णधार मॉर्गनच्या अनुपस्थितीत जोस बटलरकडे इंग्लंडच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर मॉर्गनच्या जागी लिव्हिंगस्टोन पदार्पण करणार आहे. “मी संघासोबत बराच वेळ घालवला आहे, त्यामुळे आता पदार्पणाबाबत खूपच उत्सुक आहे. ते ( टीम इंडिया ) टी-२० मालिकेसोबत वनडे मालिकेत शानदार क्रिकेट खेळलेत. त्यामुळे जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक असलेल्या संघासमोर स्वत:ची चाचणी घेण्याची ही खूप मोठी संधी आहे”, असं लिव्हिंगस्टोनने इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून जारी केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या
- ना रहाणे, ना स्मिथ, युवा खेळाडूकडे असेल दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधार पदाची धुरा
- ‘केंद्रातील सरकारचे इंधन दरवाढीबाबतचे धोरण ‘हाताची घडी तोंडावर बोट’ असेच राहिले आहे’
- आयपीएलमध्ये जडेजाचा सहभाग? सीईओने दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- भारत-इंग्लंडचा आज दुसरा वनडे सामना ; सूर्यकुमारला पदार्पणाची संधी?
- अर्जून तेंडुलकर आयपीएलसाठी सज्ज! मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

