Share

नाव परमवीर आणि संपत्ती बकासुरासारखी ? चाकणकरांनी मांडला सिंग यांच्या संपत्तीचा लेखाजोगा

Published On: 

🕒 1 min read

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांचे नाव माध्यमांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. सिंग यांनी काही दिवसांपुर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ‘लेटर बाॅम्ब’ टाकल्याने राज्यात खळबळ माजली आहे. सिंग यांच्या या पत्रामुळे भाजपला सरकारला खिंडीत पकडण्याचा मुद्दा मिळाला. यानंतर भाजपने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.

अनिल देशमुखांच्या बचावासाठी आता राष्ट्रावादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर धावून आल्या असून चाकणकर यांनी परमबीर सिंग यांच्या संपत्तीची माहिती सोशल मिडीयावर पोस्ट करत त्यांच्यावर टीका केली आहे.

नोकरीसाठी महाराष्ट्रात यायचं, राज्याची नोकरी करतानाच विरोधी पक्षाची चाकरी करायची, अमाप संपत्ती कमवायची आणि शेवटी जाताना महाराष्ट्रालाच बदनाम करून जायचं. अस कसं चालेल? अशी टीका चाकणकर यांनी केली आहे.

ट्वीटमध्ये रुपाली चाकणकरांनी मुंबईत परमबीर सिंह यांचे दोन कोटी किंमतीचे दोन फ्लॅट तर हरियाणातील त्यांच्या गावी चार कोटी रुपये किंमतीचे घर असल्याचं सांगितलंय. तसेच परमबीरांच्या पत्नीच्या नावे मुंबईत आणि हरियाणातही कोट्यवधीची स्थावर मालमत्ता असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

अंधेरीतील वसुंधरा सोसायटीत 2003 साली परमबीरांनी 48.75 लाख रुपयांचा एक फ्लॅट घेतला तर 2007 साली नेरळमधील शगुफा सोसायटीत 3.60 कोटी रुपये किंमत असलेला एक फ्लॅट घेतल्याचा आरोपही रुपाली चाकणकरांनी केलाय. तसेच परमबीर सिंहांनी 2019 मध्ये हरियाणामध्ये 14 लाख रुपयांची जमीन खरेदी केली असून त्यांच्या हरियाणातल्या घराची किंमत चार कोटी रुपये असल्याची माहितीही चाकणकरांनी दिलीय.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!