मुंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाता आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रात रुग्ण वाढ अधिक आहे. शासनाकडून खबरदारी म्हणून राज्यातील काही भागामध्ये लॉकडाऊन करण्यात आले, तर काही ठिकाणी कडक नियम लागू करण्यात आले.
राजकीय नेत्यांपासून ते बॉलिवूडमध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. बॉलिवूडमधील रणवीर कपूर, संजय लीला भन्साळी आणि आमिर खानला नुकतीच कोरोनाची लागण झाली होती. त्यातच आता बॉलिवूडमधील फिट असलेला अभिनेता मिलिंद सोमणला सुद्धा कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मिलिंद सोमण यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. ‘पॉझिटिव्ह टेस्ट आली..’ असं ट्विट त्याने केल आहे.
राज्यात सध्या कोरोनाचा प्रसार वाढत आहे. यातच राज्यातून कोरोना रुग्णांचा समोर येणारा आकडा थक्क करणारा आहे. राज्यातील मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शासनाकडून योग्य ते नियोजन करणे अपेक्षित आहे. एकीकडे देशभरात लसीकरण सुरु करण्यात आलं आहे , मात्र तरीही कोरोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे लस जरी उपलब्ध झाली असली तरी नागरिकांनी कोरोना त्रिसूत्राचे पालन करणे गरजेचे आहे. कारण कोरोनाचा वाढता प्रसार बघता नागरिक बेजबाबदारपणे वागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ना रहाणे, ना स्मिथ, युवा खेळाडूकडे असेल दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधार पदाची धुरा
- ‘केंद्रातील सरकारचे इंधन दरवाढीबाबतचे धोरण ‘हाताची घडी तोंडावर बोट’ असेच राहिले आहे’
- आयपीएलमध्ये जडेजाचा सहभाग? सीईओने दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- भारत-इंग्लंडचा आज दुसरा वनडे सामना ; सूर्यकुमारला पदार्पणाची संधी?
- अर्जून तेंडुलकर आयपीएलसाठी सज्ज! मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

