टीम महाराष्ट्र देशा : देशभरात आज बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. तर ईद निमित्त देशातील पूरग्रस्त नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येवला येथे केले आहे. आज येवला येथील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठणाच्या वेळी भुजबळ उपस्थित होते. यावेळी त्यांनी आवाहन केले.यावेळी नमाज पठणानंतर मुस्लीम बांधवांना भुजबळांनी बकरी ईद निमित्त शुभेच्छा देत देशातील पूरग्रस्त नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करावी असे आवाहन केले.
तर पूरग्रस्त कोल्हापूर-सांगली परिसरात मात्र बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करण्यात येत आहे. पूरस्थितीमुळे ईदवर केला जाणारा खर्च पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय मुस्लीम बांधवांनी घेतला आहे.सातारा जिल्ह्यातील मुस्लीम बांधवांच्या बैठकीत पुरात मोठं नुकसान झालेलं एक संपूर्ण गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घर बांधून देण्यापासून ते कपडे आणि जेवणाचा सर्व खर्च उचलण्याचा निर्णय साताऱ्यातील मुस्लीम बांधवांनी घेतला आहे.
दरम्यान,कृष्णा, वारणा, पंचगंगा नद्यांना आलेल्या पुरामुळे सांगलीची बाजारपेठ उध्वस्त झाली आहे. गेली आठ दिवस या ठिकाणची मुख्य बाजारपेठ आणि दुकाने पाण्यात आहेत. विक्रीसाठी आलेल्या शेतीमालाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- देशभरात आज ईदचा उत्साह !
- कोंढव्यात भरतोय बकऱ्यांचा अनोखा बाजार
- पूरग्रस्त क्षेत्रात विद्युत यंत्रणा, पाणीपुरवठा तत्काळ सुरू करा : महाजन
- ‘हे जनरल डायरचे सरकार आहे का?’ नवाब मलिक यांचा सरकारला सवाल…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

