Share

देशभरात आज ईदचा उत्साह !

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : शुक्रवारी रात्री 7.35 च्या सुमारास चंद्रदर्शन झाल्यान आज देशभरात ईद उल फित्र अर्थात रमजान ईद उत्साहात साजरी होत आहे.

ईद उल फित्रच्या निमित्ताने शुक्रवारी रात्रीच देशातील प्रमुख बाजारांमध्ये गजबज पाहायला मिळाली. चंद्र दर्शन झाल्यानंतर शनिवारी ईद साजरी करण्यात येण्याची घोषणा होताच, बाजारात लोकांची गर्दी वाढली.

देशभरात रमजान ईदचा उत्साह पाहायला मिळत आहे. रमजान ईदची सुरुवात ईदच्या नमाजाने होते. सर्व मुस्लीम पुरुष नवे कपडे परिधान करुन ईदच्या नमाजासाठी ईदगाह किंवा मशिदीत जातात. नमाजानंतर लोक एकमेकांची गळाभेट घेऊन ईद मुबारक म्हणत शुभेच्छा देतात.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशातील सर्व मुस्लीम बांधवांना ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा दिल्या.आपल्या संदेशात ते म्हणाले की, “ईद-उल-फित्रच्या निमित्ताने मी देशाच्या सर्व नागरिकांना विशेषत: देश आणि परदेशात राहणाऱ्या सर्व मुस्लीम बांधव आणि भगिनींना शुभेच्छा देतो. रोजानंतर पवित्र रमजान महिन्याचा उत्सहाने समारोप होत आहे. समाजात बंधुभाव आणि सामंज्यस वाढो, अशी प्रार्थना करतो.” तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सगळ्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. “समाजातील एकता आणि एकोपा टिकून राहो, अशी प्रार्थना करतो,” असं मोदींनी संदेशात म्हटलं आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!