मुंबई : रेमडेसिवीर इंजेक्शन बाबत अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिलेल्या माहितीमुळे साप-साप करत भुई थोपटणाऱ्यांचे थोबाड फुटले असल्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. राजेंद्र शिंगणे यांनी खुलासा केल्यानंतर दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एकदा टीका केलीय.
भाजपच्या वतीने मध्यस्थी करुन राज्यासाठी ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन मागवण्यात येत होते. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत संबंधीत कंपनीच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेतले होते. त्याला सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते रात्री पोलीस ठाण्यात गेले होते. यावरुन महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी भाजपला धारेवर धरले होते. मात्र, आता हा इंजेक्शनचा साठा राज्य सरकारलाच मिळणार होता, असे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर टीका केलीय.
शिंगणेंचा घरचा आहेर! जे मंत्री किंवा महाविकास आघाडीचे नेते रेमडिसिव्हरसंदर्भात भाजपाच्या बाबतीत साप साप करत भुई थोपटत होते त्यांचं थोबाड फुटलेलं आहे. @mipravindarekar pic.twitter.com/1qvD2NDQq6
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 20, 2021
डॉ. शिंगणे यांचा हा राज्य सरकारला घरचा आहेर असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. राज्य सरकारमधील मंत्र्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदीमध्ये वसूली करायची होती. त्यामुळेच त्यांनी स्वस्तात मिळत असलेले इंजेक्शन नाकारले आणि भाजपवर चूकीचे आरोप केले, असेही दरेकर म्हणाले. या सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राज्याला आता पुरेसा रेमडेसिवीरचा पुरवठा होणार असल्याचे शिंगणे यांनी स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या मंत्राना गोळ्या घातल्या पाहिजे’; निलेश राणेंचा घणाघात
- नंदुरबारमधील भाजप नेत्याच्या हॉटेलमध्ये हजारो रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा : नवाब मलिक
- ‘लस घेतलेल्या वारकऱ्यांना चैत्री वारीसाठी परवानगी द्या’, कीर्तनकार महासंघाची मागणी
- मोठा पडदा गाजवल्यानंतर बॉलीवुडचा ‘सिंघम’ ओटीटीवर पदार्पणासाठी सज्ज
- ‘नवाब मलिकांनी आता तरी तोंड काळे करावे’, भाजपच्या अतुल भातकळकरांचे आव्हान


