मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर चांगलीच टीका केली होती. नारायण राणेंनीही इतरांची उणीदुणी काढण्यापेक्षा ते बी केंद्रात मंत्री आहेत त्यांनीही निधी आणावा आणि चांगले कामे करून दाखवावी, असा खोचक टोला यावेळी अजित पवारांनी नारायण राणेंना लगावला होता.
पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत असताना अजित पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला होता. आता अजित पवारांनी केलेल्या टिके नंतर भाजप नेते प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी सोशल मिडियावर या संदर्भात व्हिडिओ पोस्ट केला आहे.
राष्ट्रवादी नेते उप-मुख्यमंत्री अजितदादा पवार राणे साहेबांची अक्कल काढायला सिंधुदुर्गात कशासाठी गेले होते? राज्याचे गृहराज्य मंत्री सतेज पाटील, मंत्री उदय सामंत, खासदार, संपूर्ण सरकार गल्लीतल्या सामन्यासाठी का गेले होते? याचे उत्तर नवाब मलिकांनी द्यावे.(1/2) pic.twitter.com/ATKlMBhSLf
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) January 2, 2022
भाजप नेते प्रविण दरेकर म्हणाले, राष्ट्रवादी नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार नारायण राणेंची अक्कल काढायला सिंधुदुर्गात कशासाठी गेले होते, असा खोचक सवाल दरेकरांनी उपस्थित केला आहे. पुढे बोलताना दरेकर म्हणाले, राज्याचे गृहराज्य मंत्री सतेज पाटील, मंत्री उदय सामंत, खासदार, संपूर्ण सरकार गल्लीतल्या सामन्यासाठी का गेले होते, याचे उत्तर नवाब मलिकांनी द्यावे, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- ‘राणेंनी इतरांची उणीदुणी काढण्यापेक्षा…’, अजित पवारांचा नारायण राणेंना खोचक टोला
- …तर मी कार्यक्रमांनाच जाणार नाही; अजित पवारांचा मोठा निर्णय
- औरंगाबादेत स्मार्ट सिटी बस सोडणार एसटीची साथ; संपाचा परिणाम!
- “…परंतु दुसऱ्याकडे बोट दाखवत असताना…”, प्रविण दरेकरांचा संजय राऊतांना टोला
- ऑडिओ क्लिप जाहीर करत नवाब मलिकांचा एनसीबीवर हल्लाबोल


