Share

…तर मी कार्यक्रमांनाच जाणार नाही; अजित पवारांचा मोठा निर्णय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची (Corona) लाट आल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आता सर्वत्र निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यात ओमायक्रॉन (Omicron) विषाणू देखील डोके वर काढत असल्याने राज्यातील परिस्थिती चिंताजनक होत आहे. त्यामुळे वेळीच काळजी उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली होती. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वेगाने वाढत आहे. ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून सभा, मेळावे तसेच सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे राज्यातील काही मंत्री, आमदारच या नियमांना पायदळी तुडवत असल्याचे समोर आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कार्यक्रमांना देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे विरोधी पक्षाने अजित पवारांवर चांगलीच टीका केली आहे.

विरोधकांकडून झालेल्या टिके नंतर अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, एखाद्या कार्यक्रमाला जायचे असेल तर आधी किती लोक आहेत, कोरोना नियमांचे पालन होत आहे का, या बाबी विचारणार आहे. तसेच जर कार्यक्रमात ५० पेक्षा जास्त लोक असतील तर मी कार्यक्रमांना जाणार नाही, असा निर्णय अजित पवारांनी घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!