🕒 1 min read
पुणे : आज(२ जाने.)प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच नारायण राणेंनी इतरांची उणीदुणी काढण्यापेक्षा ते केंद्रात मंत्री आहेत त्यांनीही निधी आणावा, असा खोचक टोला अजित पवार यांनी लगावला आहे.
यावेळी आपल्या रोखठोक शैलीत बोलत असतांना अजित पवार म्हणाले की,’कोकणात आम्ही काय मदत केली हे सगळ्यांना माहिती आहे. तौक्ते चक्रीवादळात मदत केली, बंधारे बांधतोय. त्यामुळे नारायण राणेंनीही इतरांची उणीदुणी काढण्यापेक्षा ते बी केंद्रात मंत्री आहेत त्यांनीही निधी आणावा. कामे करावी. सिंधुदुर्ग जिल्हा बँक ज्यांच्या ताब्यात गेली. त्यांनी चांगले कामे करून दाखवावी,’ असे पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, पुढे पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात बोलत असतांना पवार म्हणाले की,’काही जागा मी बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यामध्ये दुर्दैवाने आम्हाला यश मिळाले नाही. आम्ही आमच्या परीने आमच्या विचाराचे लोक निवडूण आणण्याचा प्रयत्न करतोय. हवेली पुणे, पिंपरी चिंचवडनंतर विचार करायचा झाल्यास सर्वात जास्त मतदान बारामती येथे झाले आहे’, असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- …त्यामुळे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार प्रधान सेवकांनी करू नये- संजय राऊत
- ‘मावळत्या वर्षातील जळमटे दूर करून खोटे बोलणाऱ्यांना घरी बसवा’
- ‘यामधून सामान्य हिंदुस्थानी माणसाचे भवितव्य कसे सुधारणार?’, संजय राऊतांचा सवाल
- ‘ज्यांना गांधीजींवर हल्ले करणाऱ्यांचा विचार मान्य आहे,त्यांनी जगात जाऊन गांधी विचारांचा वारसा सांगू नये’
- ‘रोज एक पत्रावळी छापून गरळ ओकण्यापेक्षा…’, राम सातपुतेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
