Share

औरंगाबादेत स्मार्ट सिटी बस सोडणार एसटीची साथ; संपाचा परिणाम!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: गेल्या दीड महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपाचा थेट परिणाम शहरातील स्मार्ट सिटी बससेवेवरही झाला आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटीने शहरवासीयांच्या सुविधेसाठी सुरू केलेली स्मार्ट बस गेल्या दीड महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे एसटी महामंडळ सोबत केलेल्या कराराचा फेरविचार केला जाणार असल्याची माहिती प्रशासक आस्तिक कुमार पांडेय(Aastik Kumar Pandey) यांनी  (दि.३१)दिली.

शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने स्मार्ट सिटी बससेवा सुरू करण्याचा निर्णय औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट बोर्डाने घेतला होता. त्यानुसार १०० बस खरेदी करण्यात आल्या. बस सेवा चालविण्यासाठी वाहक व चालक एसटी महामंडळाकडून घेण्यासंबंधी सामंजस्य करार २०१८ मध्ये करण्यात आला होता.

मात्र आता गेल्या दिड महिन्यांपासून एसटी महामंडळाचे कर्मचारी संपावर गेले आहेत. त्याचा फटका शहर बसला बसला आहे. याविषयी पांडेय म्हणाले, नव्या वर्षात शहर बस स्वतंत्र केली जाईल. महामंडळ सध्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अडचणीत आहे. त्याचा फटका शहर बसला बसला आहे. त्यामुळे शहर बससाठी स्वतंत्र कर्मचारी घेण्याचे नियोजन आहे. येत्या वर्षभरात सामंजस्य कराराचा फेर आढावा घेतला जाईल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!