Share

ऑडिओ क्लिप जाहीर करत नवाब मलिकांचा एनसीबीवर हल्लाबोल

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांनी आज(२ जाने.)पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत एनसीबीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच यावेळी त्यांनी एक ऑडिओ क्लिप जाहीर केली असून हि क्लिप नसीबी अधिकारी आणि पंच यांची असल्याचा दावा केला आहे. तसेच एनसीबीकडून मागील तारखांच्या पंचनाम्यांवर पंचांच्या सङ्या घेऊन पंचनामे बदलण्याचे प्रकार केले जात असल्याचेही मलिक म्हणाले आहेत.

यावेळी बोलत असतांना मलिक म्हणाले की,’जवळपास दोन महिन्यांपूर्वी झालेल्या क्रुझ रेड प्रकरणात एनसीबीचा फर्जीवाडा सुरू असून मॅडी नावाचा एनसीबीचा एक पंच आहे त्याला बाबू नावाचा एक अधिकारी पंचनामा बॅक डेटेडवर सही करण्यासाठी सांगत आहे. त्यानंतर घाबरलेला पंच समीर वानखेडेंना फोन करुन विचारतो तेव्हा समीर वानखेडे सांगतात की, सही करा काही होणार नाही. एनसीबीचे अधिकारी अडचणीत येणार हे लक्षात येताच पंचनामे बदलण्याचे काम सुरू आहे.’

दरम्यान, यावेळी कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप ऐकवत नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर निशाणा साधला. तसेच एसआयटी समीर वानखेडे आणि बाबू नावाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार का? असा सवालही मलिकांनी विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!