मुंबई : गेल्या दोन दिवसांमध्ये मुंबईत झालेल्या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचून मुंबईकरांचं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. सगळ्याच महत्त्वाचं म्हणजे मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल देखील ट्रॅक्सवर पाणी साचल्यामुळे काही काळ बंद ठेवावी लागल्यामुळे यावर मुंबईकरांची तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.
तर भाजपचे आमदार आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मुंबईत पाणी साठल्यावरून केंद्रावर टीका करणाऱ्या शिवसेनेला खोचक शब्दांमध्ये टोला हाणला आहे. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केलेल्या एका विधानावरून त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
यांचं म्हणजे ना… नाचता येईना अंगण वाकडं, रांधता येईना ओली लाकडं! स्वत:चं अपयश झाकण्यासाठी आलं अंगावर की ढकललं केंद्रावर!”, अशा शब्दांत प्रविण दरेकर यांनी ट्विटरवरून खोचक टीका केली आहे.
यांचं म्हणजे ना…
नाचता येईना अंगण वाकडं,
रांधता येईना ओली लाकडं!स्वतःचं अपयश झाकण्यासाठी,
"आलं अंगावर की, ढकललं केंद्रावर!" pic.twitter.com/rzM5OdyPWs— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) June 12, 2021
काय म्हणाले होते राहुल शेवाळे?
केंद्र सरकारच्या दिरंगाईमुळेच मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचले. गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरु झाल्यानंतर हिंदमाता, माटुंगा, सायन आणि दादर भागात पाणी साचत आहे. हिंदमाता येथे पाणी साचण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी जबाबदार आहेत. तीन महिन्यांपासून हिंदमाता येथील अंडरग्राऊंड ड्रेनेज टनलची परवानगी मागितली जात आहे. मात्र, ही परवानगी उशीरा आल्याने हे काम होऊ शकले नाही. त्यामुळे हिंदमाता परिसरात पाणी साचते असा आरोप शेवाळे यांनी केला होता.
महत्वाच्या बातम्या
- ‘चला, राऊतांनी हे मान्य तर केलं की त्यांचा वाघ पिंजऱ्यात आहे!’, चंद्रकांत पाटलांचा पलटवार
- ‘केंद्रात काहीही होवो, युपीत भाजपचे सरकार जाणार हे निश्चित’, राष्ट्रवादीचा दावा
- ‘बाळासाहेब असते तर विमानतळाला नाव नाकारले असते!’, भुजबळांचा शिवसेनेला सल्ला
- आरक्षणावर नक्षल्यांची भूमिका जाहीर, ‘मराठा समाजातील दलाल नेत्यांपासून सावध राहा!’
- वाघाच्या वादात भुजबळांची उडी, भाजपला म्हणाले, ‘वाघ पंजाही मारू शकतो!’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

