Share

वाघाच्या वादात भुजबळांची उडी, भाजपला म्हणाले, ‘वाघ पंजाही मारू शकतो!’

Published On: 

नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यात सुरू असलेल्या वाक्युद्धात आता राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनीही उडी घेतली आहे. ‘मैत्री कोणाशी करायची, हे वाघाच्या मनावर अवलंबून असते. वेळ पडल्यास वाघ पंजाही मारू शकतो’, असा इशारा भुजबळ यांनी भाजपला दिला आहे.

नाशिक दौऱ्यावर असलेल्या भुजबळ यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील प्रश्नांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मोदींशी एकांतात चर्चा केली. यावरून राज्यात रंगलेल्या राजकीय द्वंद्वात भुजबळ यांनी दंड थोपटत भाजपवर निशाणा साधला.

मोदींच्या भेटीबाबत शिवसेना मवाळ भूमिका घेत असल्याच्या प्रश्नाबाबत भुजबळ यांनी सावध प्रतिक्रिया दिली. राज्याचे अनेक प्रश्न केंद्राशी संबंधित आहेत. त्यामुळे जमवून घ्यावेच लागते; परंतु मैत्री करायची की नाही, हे वाघाच्या मनावर आहे. वेळ पडल्यास वाघ पंजाही मारू शकतो, असा टोला भुजबळ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला.

मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात सुटणार
खासदार संभाजीराजे यांनी कोरोनाच्या काळात आंदोलन करावे की नाही, हे मी सांगू शकत नाही; परंतु ते शाहू, फुले, आंबेडकर यांचे भक्त आहेत, संयमी नेते आहेत. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाहीत, याची ते पुरेपूर काळजी घेतील, असे नमूद करत मराठा आरक्षणाच्या विषयावरून विचलित होण्याची गरज नाही. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात सुटणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

प्रशांत किशोर यांचा सल्ला पवार नक्की ऐकतील
प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीबाबत भुजबळ म्हणाले की, ही भेट कशासाठी होती, हे आपल्याला माहीत नाही; परंतु प्रशांत किशोर यांनी पवारांना सल्ला दिला, तर पवार नक्की ऐकतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!